सुसाट वाऱ्यासह मुसळधार पाऊस; कोणत्या पिकांचे नुकसान ?

0

बुलढाणा BULDHANA  – शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हातचा गेल्याने शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय राहिलेला नाही. सोसाट्याचा वारा आणि झालेल्या मुसळधार पावसामुळे मोताळा तालुक्यातील आव्हा परिसरात 4 जानेवारीला दुपारी सुसाट वाऱ्यासह प्रचंड प्रमाणात पाऊस झाला.  Wheat, Tur, Maize, Gram यात गहू, तुर्, मका, हरबरा या पिकांचे आतोनात नुकसान झाले. एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागलं नाही.

दुष्काळ पडल्यामुळे खर्च देखील निघाला नाही. तर दुसरीकडे मोठ्या आशेने रब्बी लागवड शेतकऱ्याने केली. त्याला रात्रंदिवस पाणी देऊन फवारा, खते देऊन मेहनत शेतकऱ्यांनी केली आहे. परंतु आता ऐन वेळेवर पावसामुळे पीकं आडवी झाली आहेत. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून सरसकट हेक्टरी 25 हजार रुपये शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळाली पाहिजे, शेतकऱ्याला लागलेला उत्पादम खर्च तरी शासनाने भरुन द्यावा जेणेकरून शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, अशी मागणी शेतकरी करत आहेत.