
रत्नागिरी – दक्षिण कोकण-गोवा किनाऱ्यालगत अरबी समुद्रावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हवामान खात्याने दिलेल्या अलर्टच्या पार्श्वभूमी रत्नागिरीत मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याचे दिसून येत आहे. पहाटे पावसाचा वेग मंदावला होता. परंतु सकाळपासून पावसाने आपली गती अजून वाढवल्याचे सध्या रत्नागिरीमध्ये दिसून येत आहे. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. प्रशासनाने सर्व नागरिकांना तसेच मच्छीमार बांधवांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.