
अमरावती – देशभरात सध्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने डोके वर काढले आहे. राज्यातही ओमायक्रॉनच्या जे एन-१ या सब व्हेरिएंटने शिरकाव केल्याने अमरावती जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. त्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य विभागाने कोविड टेस्टींगचे प्रमाण वाढवले आहेत. जिल्हा शासकीय ग्रामीण रुग्णालयातील वॉर्ड क्र.10 मधील 30 बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. अमरावतीत कोरोनाचा नवा व्हेरिएंट जरी आला नसला तरी काळजी घेणे आवश्यक आहे. आता कोरोना नियम पाळा, घाबरून जाऊ नका असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांनी केले आहे.