तुरुंगवास टाळण्यासाठी ते भाजपमध्ये गेले -राज ठाकरे

0

पनवेल- पंतप्रधान नरेंद्र मोदी  Prime Minister Narendra Modi यांनी राष्ट्रवादीवर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केल्यावर त्याच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीचे हे सगळे टोणगे भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. ‘आत’ जाण्यापेक्षा भाजपसोबत गेलेलो बरे असा विचार करून ते सत्तेत सहभागी झाले असतील, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी अजित पवार गटावर केली. (MNS President Raj Thackeray) पनवेल येथे आयोजित मनसेच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्ग आणि रस्त्यांवरील खड्ड्यांवरुनही त्यांनी भाजपचा समाचार घेतला.
अजित पवार गटाचा उल्लेख करून राज ठाकरे म्हणाले, तुरुंगात काय काय असते हे भुजबळांनी अजित पवारांना सांगितले असावे. तुरुंगात जाण्यापेक्षा भाजपसोबत गेलेले बरे, असा सल्ला त्यांनी दिला असावा.