

कोलकाता निर्भयाप्रकरणी नराधमाला फासावर लटकवा, पंतप्रधान, गृहमंत्र्यांकडे आनंद रेखी यांची मागणी
Kolkata Doctor Rape Murder Case : नवी दिल्ली (New Delhi) : कोलकाता येथे महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाला तात्काळ फासावर लटकवावे, जेणेकरून यापुढे कोणीही अशाप्रकारचा गुन्हा करण्याची हिंमत करणार नाही, अशी मागणी राष्ट्रीय मराठी मोर्चाचे अध्यक्ष आनंद रेखी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांना केली आहे.
कोलकत्ता येथे महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्याची घटना अतिशय निंदाजनक आहे. यापुढे अशाप्रकारचा गुन्हा करण्याची कुठल्याही नराधमाची हिंमत होणार नाही, यासाठी अटकेत असलेला मुख्य आरोपी संजय रॉयची सीबीआय चौकशी तात्काळ पूर्ण करावी, त्याच्यावर विशेष न्यायालयात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी रेखी यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.
देशात रक्षाबंधनाचा सण आहे. या सणाला कोलकाता येथील निर्भयावर झालेल्या अत्याचाराची घटना देशातील कुठल्याही भगिनीसोबत पुन्हा होऊ होऊ नये, यासाठी युवकांनी केवळ आपल्याच नव्हे तर सर्व बहिणींच्या रक्षणाची प्रतिज्ञा घेण्याची आवश्यकता आहे. महिला भगिनींच्या रक्षणासाठी युवकांनी पुढे यावे, असे आवाहन देखील रेखी यांनी केले आहे.