“हथकरघा 2025” स्टेट हॅण्डलुम एक्स्पोला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

 

नागपूर : खास दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वस्त्र मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्लीच्या सौजन्याने महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्या. उमरेड रोड,नागपूरच्यावतीने आयोजित “हथकरघा 2025” स्टेट हॅण्डलुम एक्स्पोला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हे प्रदर्शन 6 ते 19 ऑक्टोबर 2025 दरम्यान कुसुमताई वानखेडे भवन येथे आयोजित करण्यात आले आहे.

या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, जम्मू-कश्मीर, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड या राज्यांतील हातमाग विणकर सहकारी संस्था सहभागी झाले आहे.

ग्राहकांना येथे पारंपरिक तसेच आधुनिक डिझाईन्समधील हातमाग कापड, साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि गृहोपयोगी वस्तू मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.या हातमाग प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे हातमाग उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, ग्रामीण विणकरांच्या कलाकृती थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवणे आणि नव्या डिझाईन्सची माहिती ग्राहक व विणकरांपर्यंत पोहोचवणे.

ग्राहकांसाठी प्रदर्शन दररोज सकाळी 11.00 ते रात्री 9.00 पर्यंत खुले आहे आणि प्रवेश मोफत आहे. नागपूरकरांचा या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

या प्रदर्शनीचे प्रमुख उद्दिष्टे म्हणजे –

– हातमाग उत्पादित कापडाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे.

– ग्रामीण विणकरांच्या उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविणे.

– हातमाग क्षेत्रातील वैशिष्टयपूर्ण डिझाईन्सची ओळख करून देणे.

– नव्या डिझाईन्स व त्यांच्या बाजारपेठेची चाचणी करणे.

हातमागावर विणलेले कापड परंपरेची ओळख व वैभवशाली दर्जा जपणारे असल्याने या प्रदर्शनामुळे विणकरांना प्रोत्साहन मिळणार आहे तसेच ग्राहकांना थेट खरेदीची ही सुवर्णसंधी आहे.