

चंद्रपूर(chandrapur):- मान्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीतील जीर्ण इमारती तोडण्याचे काम सुरू, महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे तोडक कारवाई
मान्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीतील जीर्ण इमारती तोडण्याचे काम युद्ध स्तरावर सुरू आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीत सुमारे शंभरहून अधिक इमारती जीर्ण घोषित करत त्या पाडण्याच्या नोटीस मालकांना देण्यात आल्या आहेत.
धोकादायक ठरू शकणाऱ्या व जीवित -वित्तहानीस कारणीभूत ठरणाऱ्या काही इमारती महापालिका स्वतः पुढाकार घेत तोडत आहे. चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती भागात जटपुरा गेट परिसरात असलेली एक मोठी चाळ अशाच पद्धतीने महानगरपालिकेच्या पथकाने जेसीबीच्या सहाय्याने तोडली. महानगरपालिकेच्या वतीने पावसाचे पाणी वाहून जाणाऱ्या मोठ्या नाल्यांवरील अतिक्रमण देखील प्राधान्याने तोडले जात आहे.