
अर्धसत्याचे राजकारण
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिन समारंभात पाचव्या रांगेत बसविण्यात आले व त्यांचा अपमान करण्यात आला ,हे अर्धसत्य अधिकृतपणे पसरविण्याचा काॅग्रेस पक्षाचा प्रयत्न अतिशय निंदनीय म्हणावा लागेल.या अर्धसत्याच्या राजकारणामुळेच त्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत शंभरचा आकडा ओलांडता आला नाही.तरीही त्याला आपल्या भूमिकेचा फेरविचार करावासा वाटत नाही , हे आपल्या लोकशाहीचे सर्वात मोठे दुर्दैव आहे.कारण आता जी खरी व अधिकृत माहिती बाहेर आली त्यावरून हे स्पष्ट होते की, विरोधी पक्षनेत्याचा मंत्र्याचा दर्जा लक्षात घेऊनच त्यांच्यासाठी पहिल्या रांगेत पहिले आसन निश्चित करण्यात आले होते.पण त्यांनी स्वतःच मला जनतेत बसायचे आहे म्हणून पाचव्या रांगेतील पहिली खुर्ची पसंत केली.पण काॅग्रेस पक्षाने हे सत्य झाकून ठेवून अर्धसत्य पसरविण्याचा निंद्य प्रयत्न केला आहे.
खरे तर लाल किल्यावरील स्वातंत्र्यदिन समारंभाची सर्व व्यवस्था संरक्षण खात्याकडे असते.शिस्तीच्या बाबतीत ते किती कठोर असते हे वेगळे सांगण्याची गरज नाही.पण राहुल गांधी नेहमीच आपल्या तोर्यात वावरत असतात.त्यांची उद्दामवृत्ती त्यांच्या शब्दाशब्दातून व छोट्या छोट्या कृतीतून डोकावत असते.यावेळीही स्वातंत्र्यदिन सोहोळ्याचे औचित्य धुडकावून त्यानी तसेच वर्तन केले आहे.ते अर्थातच निषेधार्ह आहे.