

राज्यात पुढचे चार ते पाच दिवस वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीमध्ये काही ठिकाणी 40 तर काही ठिकाणी 60 किमी ताशी वेगाने वारे वाहणार आहेत.
हवामान तज्ज्ञ यांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवापालट पुढचे पाच दिवस पाहायला मिळणार आहे. तसेच काही भागात गारपिटीचा इशारा देखील देण्यात आला आहे. पुढच्या 48 तासात मराठवाड्यात 38 ते 45 डिग्री तापमान राहील. मराठवाडा आणि विदर्भासाठी पुढचे 48 तास महत्त्वाचे आहेत.
माहितीनुसार, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, या जिल्ह्यात यलो अलर्ट, तर नाशिक, जळगाव, नाशिक घाटमाथा, पुणे, कोल्हापूर, घाटमाथा, सातारा, सांगली, इथे काही भागात ऑरेंज तर काही भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज आणि उद्या संपूर्ण महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात पाऊस राहणार आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.