

(Nagpur)नागपूर– आज मंगळवारी दुपारी 2 वाजता (Maharashtra Pradesh Youth Congress)महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तर्फे भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली नागपूर येथे काँग्रेसतर्फे होऊ घातलेल्या 138 व्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमाचा संदेश सर्व सामान्य नारिकांपर्यंत पोहचविण्यासाठी काढण्यात येत आहे.
ही रॅली संविधान चौक ते देवडिया कांग्रेस भवन पर्यंत जाणार आहे.