

नागपूर – श्री गुरू नानक जयंती GURU NANAK JAYANTI २७ नोव्हेंबर रोजी असून त्या निमित्त विविध कार्यक्रम होत आहेत. यंदा शिख समाज, बहावलपुरी समाज पंचायत व सिंधी समाज पंचायत बांधवांनी भव्यदिव्य स्वरूपात जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांपासून याची जय्यत तयारी सुरू आहे. जयंतीनिमित्त श्री गुरूद्वारा येथून भव्य नगर किर्तन यात्रा काढण्यात आली. यात्रेमध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, नांदेड आदी गावातील भाविक यात्रेत सहभागी झाले.ही यात्रा शहरातील विविध मार्गाने मार्गक्रमण केल्यानंतर श्री गुरूद्वारा येथे समारोप करण्यात आला. ठिकठिकाणी यात्रेचे स्वागत नागरिकांकडून झाले. जागोजागी चहा, पाणी, अल्पोपहार आदींची व्यवस्था सुध्दा करण्यात आली. नगर किर्तन यात्रेत नागपूर येथील समाजबांधवाकडून पारंपारिक शस्त्रकलेचे प्रदर्शन नागरिकांचे आकर्षण ठरले.