
सर्वसामान्यांमध्ये देव, धर्माबाबत जागृती निर्माण करण्यासह शीख धर्माची शिकवण देणाऱ्या गुरूनानक यांचे चिंतन धर्माच्या सत्य व शाश्वत मुल्यांचे मूळ होते. मानवतावादावर दृढ श्रद्धा असलेले, जात-धर्म यापलीकडे जाऊन एकतेची शिकवण आणि ‘कलि महि राम नाम सारु’चा उपदेश देणाऱ्या गुरू नानकदेव यांची आज जयंती आहे. कार्तिक पौर्णिमेला येणारी गुरू नानकदेव यांची जयंती प्रकाश पर्व म्हणूनही साजरी केली जाते.
गुरू नानक लहानपणापासूनच धार्मिक होते. लहानपणी मौंजीबंधनावेळीच त्यांनी जानवे घालायला नकार दिला होता. ज्ञानप्राप्तीनंतर शीख धर्माच्या तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांनी देशभर यात्रा केली. जगभरातील धार्मिक स्थळांनाही त्यांनी भेटी दिल्या.
सर्वसामान्यांमध्ये देव, धर्माबाबत जागृती निर्माण करण्यासोबतच त्यांनी शीख धर्माची शिकवण दिली गुरू नानक यांनी आयुष्यभर हिंदू व मुस्लिम धर्मियांना एकतेचा संदेश दिला. त्यांनी त्या काळात केवळ भारतभ्रमणच नव्हे तर इराकमधील बगदाद आणि सौदी अरेबियात मक्का- मदिनेचीही यात्रा केली होती. अनेक अरब देश त्यांनी पालथे घातले होते.गुरू नानक यांची मानवतावादावर दृढ श्रद्धा होती. त्यांचे चिंतन धर्माच्या सत्य व शाश्वत मुल्यांचे मूळ होते. म्हणूनच जात-धर्म या पलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र यावे अशी त्यांची इच्छा होती. एकदा बेई नदीतून स्नान केल्यानंतर बाहेर आल्यावर त्यांनी ‘कुणीही हिंदू नाही आणि कुणीही मुसलमान नाही, सर्व जण मानव आहोत’, असा नारा दिला होता. हे जग बनविणारा एकच इश्वर आहे, असे त्यांचे म्हणणे होते. धर्म हे दर्शन आहे, दिखावा नाही, अशी त्यांची धारणा होती.त्यासाठी अनेक केंद्राची साखळी निर्माण केली. त्यांनी एकता, श्रद्धा व प्रेमाचे तत्वज्ञान मांडले. ते क्रांतिकारी विचारांचे होते. त्यांनी नवीन विचारधारेचा प्रचार केला.
गुरु नानक जयंतीचा इतिहास –
गुरु नानक देवजींना शीख धर्माचे पहिले गुरु मानले जाते. त्यांना नानक देव, बाबा नानक आणि नानक शाह या नावानेही ओळखले जाते. लडाख आणि तिबेटच्या प्रदेशात त्यांना नानक लामा म्हणतात. गुरु नानक देव यांचा जन्म 1526 मध्ये कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी झाला. हा दिवस दिव्यांचा सण म्हणून साजरा केला जातो. गुरु नानकजींनी मनुष्याच्या जीवनाशी संबंधित अनेक शिकवणी दिल्या आहेत, ज्याचे लोक आजही पालन करतात. गुरु नानक देव यांचा जन्म भोईची तलवंडी येथे झाला. या ठिकाणाला रायभोईची तलवंडी असेही म्हणतात. आता हे ठिकाण पाकिस्तानच्या नानकाना साहिबमध्ये आहे. या ठिकाणाला गुरु नानक देव यांचे नाव देण्यात आले. ‘ननकाना साहीब’ गुरुद्वाराची निर्मिती राजा महाराजा रणजितसिंह यांनी केली होती.
गुरू नानक देवजींनी शीख समाजाची पायाभरणी केली होती हे उल्लेखनीय. गुरु नानक जी हे शीख समाजाचे पहिले गुरु आणि या धर्माचे संस्थापक मानले जातात. भारताव्यतिरिक्त गुरू नानक देवजींनी अफगाणिस्तान, इराण आणि अरब देशांमध्येही प्रवचन दिले आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर वयाच्या 16 व्या वर्षी सुलखानीसोबत त्यांचे लग्न झाले. त्यांना श्रीचंद आणि लखमीदास असे दोन पुत्र झाले.
गुरु नानक देव यांनी आपले जीवन मानव समाजाच्या कल्याणासाठी समर्पित केले. त्यांच्या जन्म तिथीला प्रकाश पर्वाचा सण साजरा केला जातो.
गुरू नानक यांचे अनमोल विचार
जगाला एकता, श्रद्धा आणि प्रेमाचा संदेश देणारे गुरू नानक यांच्या जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
शिख धर्माचे संस्थापक आणि प्रथम गुरु, गुरु नानक देव यांच्या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन गुरू नानक यांच्या जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!