शिर्डीत आज गुढीपाडवा उत्सव

0

 

साई संस्थानतर्फे विविध कार्यक्रम

अहमदनगर(Ahmednagar) – आज गुढीपाडवा उत्सवाच्या निमित्ताने श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या पत्नी वंदना गाडीलकर यांचे हस्ते गुढीची विधीवत पूजा करुन श्री साईबाबा मंदीराचे कळसावर गुढी उभारण्‍यात आली. यावेळी श्री साईबाबा संस्थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ ज्योती हुलवळे , प्रशासकीय अधिकारी विठ्ठलराव बर्गे, मंदीर विभाग प्रमुख रमेश चौधरी, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके व संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदी उपस्थित होते.