से नि शिक्षकांचा गटविमा पाच वर्षापासून प्रलंबीत

0

से नि शिक्षकांचा गटविमा पाच वर्षापासून प्रलंबीत आहे . शिक्षणाधिकारी यांनी एक पत्र काढून निकषापेक्षा कमी करण्यात आलेली कपात ब त्यावर से नि दिनांका पर्यंतच 12% चक्रवाढ व्याजाची रक्कम रिर्जव बँके मध्ये चालान द्वारे त्वरीत भरावी असे पत्र काढून संबंधिताची प्रकरणे परत पाठविली आहे . साधारणतः पाच वर्षानंतर शासनाला ही तृटी दिसलेली आहे . यात से नि शिक्षकांचा काय दोष . ? चुकी प्रशासनाची व भुर्दंड शिक्षकांना या अन्यायाची दाद आज से नि दरमहिन्यात होणाऱ्या पेशन अदालती मध्ये मांडली . परंतू कोषागाराचे नांव घेऊन प्रश्न तसाच पेंडिंग ठेवण्यात आला . त्यामूळे महासभेचे अध्यक्ष अशोकराव दगडे यांचे नेतृत्वाखाली शिक्षणा धिकारी यांचे कक्षात प्रतिनिधी मंडळ व पिडित सेनि शिक्षक यांचे सह चर्चा केली या प्रसंगी अध्यक्ष दगडे यांनी या संबंधातील सर्व शासनाचे GR वाचून दाखविले व यात 12% चक्रवाढ व्याजाची कुठे ही उल्लेख नसल्याचे दाखवून दिले .

यावर प्रशासन स्तरावर कोषागार अधिकारी यांचेशी चर्चा करून प्रश्न सोडवू असे संदिग्ध आश्वास न शिक्षणाधि कारी यांनी देताच चर्चेत संघटनेच चा सहभाग घ्यावा . असे अध्यक्ष दगडे व सरचिटणीस दिपक सावळकर राज्यप्रतिनिधी विनोद राउत वं उपाध्यक्ष जयदेव टाले यांनी आग्रह केला असता .

प्रसंग पडल्यास आम्ही जरूर बोलाउ असे प्रभारी शिक्षणाधिकारी निखील भूयार यांनी दिले त्याच वेळी । मुख्य लेखाधिकारी कुमुदिनी श्रीखंडे मॅम यांची याच विषयावर कोषागार अधिकारी यांचे शी चर्चा सुरू असल्याचे शिक्षणा धिकारी यांनी सांगितले . याच चर्चेत निवडश्रेणी जि आदर्श शिक्षक पुरस्कार . पदवीधर वेतन श्रेणी असे अनेक थकीत प्रकरणे सरिता किंमतकर,संजय भेंडे , दिपक तिडके . राम ठाकरे . अनिल नागपूरे सुधाकर भुरके . ज्ञानेश्वर वानखेडे . जयश्री कावळे दामोधर झाडे . मुरलीघर काळमेघ . रामदास काकडे ‘ नबीशेख या पदाधिकाऱ्यांनी चर्चेत भाग घेतला . व उपस्थित पिडित सर्व से नि शिक्षकांनी आम्ही 12% चक्रवाढ व्याज से नि दिनांकापर्यंत भरणार नसल्याचे लेखी निवेदन शिक्षणाधिकारी यांना दिले . या चर्चेत तोडगा न निघाल्या मुळे अध्यक्षांनी नाराजी व्यक्त करून जिलह्यात मोठे आंदोलन उभारून हा प्रश्न सोडवू असे उपस्थित सेनि शिक्षक यांना आश्वास दिले