

‘शाश्वत पायाभूत सुविधांचा विकास, जैवविविधता आणि हवामान बदलावरील प्रभाव’ वर झाली चर्चा
इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन नागपूर चॅप्टरने व्हीएनआयटी नागपूर येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ग्रीन फाऊंडेशन नागपूरने “शाश्वत पायाभूत सुविधा विकास, जैवविविधता आणि हवामान बदलावरील प्रभाव” या विषयावर चार सत्रांचे यशस्वी आयोजन केले.
ग्रीन फाउंडेशनचे अध्यक्ष व नीरीचे माजी संचालक डॉ. सतीश वटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सत्रांमध्ये ग्रीन फाउंडेशनचे सत्र समन्वयक डॉ. डी.जी. गारवे, कॅप्टन डॉ. एल. बी. कलंत्री यांची उपस्थिती होती. आयसीडब्ल्यूएसडीचे सल्लागार अध्यक्ष्ज्ञ व व्हीएनआयटीचे माजी प्रा.डॉ.व्ही.एम.म्हैसाळकर यांची ही संकल्पना होती.
डॉ. सतीश वटे यांनी प्रास्ताविकातून पृथ्वीवरील पाण्याच्या अस्तित्वाचे महत्त्व विशद केले. पहिल्या सत्रात एनिया डिझाइन प्रा. लिमिटेडचे कार्यकारी संचालक वास्तुविशारद वेदप्रकाश पूर्णेंदू यांनी ‘ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंग विथ नेचर’ या विषयावर आपले विचार आणि अनुभव सांगितले. दुस-या सत्रात ‘एनलिव्हिंग बायोडायव्हर्सिटी ऑफ नागपूर सिटी’ विषयावर ग्रीन फाउंडेशनचे जैवविविधता तज्ञ दिलीप चिंचमलतपुरे आणि नागपूर विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. नितीन डोंगरवार यांचे मार्गदर्शन लाभले. तिसऱ्या सत्रात ‘वॉटर कॉन्झरर्वेशन इन कोल मायनिंग’ विषयावर डब्ल्यूसीएलचे पर्यावरण प्रमुख आणि महाव्यवस्थापक प्रशांत लोखंडे यांनी केस स्टडी सादर केली तर चौथ्या सत्रात ‘वॉटर कॉन्झरर्वेशन अँड सस्टेनेबिलीटी थ्रू कम्युनिटी इन्व्हाल्वमेंट’ विषयावर निसर्ग विज्ञान मंडळाचे अध्यक्ष डॉ. व्ही. एल घुगे यांनी आपले विचार मांडले.
चारही सत्रांना श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. प्रतिनिधींनी पॅनेल चर्चेत सक्रिय सहभाग घेतला. ग्रीन फाउंडेशन नागपूर ही नोंदणीकृत ना-नफा एनजीओ असून रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री माननीय नितीन गडकरी हे त्याचे मुख्य संरक्षक आहेत.