महायुतीला विदर्भात उत्तम वातावरण

0

 

-मुख्यमंत्री शिंदे (Chief Minister Shinde)

नागपूर (Nagpur )- विदर्भातील जनतेने तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना गॅरंटी दिलेली आहे. रामटेक, यवतमाळ- वाशिम शिवसेना मोठ्या फरकाने बहुमताने जिंकेल. विदर्भात अतिशय उत्तम वातावरण असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानतळावर रविवारी दुपारी नागपुरात विविध कार्यक्रमासाठी आल्यावर माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद विदर्भामध्ये महायुतीला आहे. मी रामटेकचे उमेदवार राजू पारवे तसेच नागपूरचे महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी यांचे नामांकन अर्ज भरण्यासाठी नागपूरला आलो होतो. विदर्भातील सर्व जागा महायुतीचे उमेदवार जिंकतील असे चांगले वातावरण आहे.

दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक चित्र लवकरच स्पष्ट होईल. उमेदवारीबाबतचा घोळ दोन-तीन दिवसांमध्ये स्पष्ट होणार. दरम्यान, काल मुंबईत शिवसेना पदाधिकारी बैठकीत शिवसेनेने अधिक जागा सोडू नये अशी भावना होती यासंदर्भात छेडले असता निवडणूक काळात पदाधिकाऱ्यांच्या बैठका या सातत्याने होतच असतात. पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही निवडणूक लढवत आहे. आदित्य ठाकरे यांना टीका करण्यापेक्षा दुसरे काही काम आहे का असा टोला लगावला.