

किल्ले देखाव्यासह फटाका शो ठरले आकर्षणाचे केंद्र
नागपूर (nagpur) – शिवजन्मोत्सव सोहळा समिती दक्षिण नागपूर, अमर धरमारे मित्र परिवार, ज्ञानेश्वर नगर मित्र परिवार व नवयुवा जनशक्ती मंडळ दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त भव्यदिव्य अशा समारंभाचे आयोजन १९ फेब्रुवारी रोजी ज्ञानेश्वर नगर प्रवेशव्दार, कुदरत चौक, मानेवाडा रोड, नागपूर येथे करण्यात आला होता़ भव्य शिवकालीन किल्ला देखावा, फटाका शो, छत्रपती शिवरायांची महाआरती, फटाका शो, शिवमुद्रा ढोल ताशा पथक वादन तसेच ३५१ किलो लाडुंचा प्रसाद यावेळी वितरीत करण्यात आला़
दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त नागपूरातील हे आयोजन सर्वांसाठी प्रथम क्रमांकाचे आकर्षणाचे केंद्र असते़ विविध कलाकृतीने सज्ज असलेला महाराजांचा देखावा, पुतळा, मंच, रोषणाई असे बरेच काही नागरिकांना अनुभवायला मिळते़ येथे हजारोंच्या संख्येने नागरिक सहभाग घेतात तसेच शेकडो कार्यकर्ते रात्रंदिवस या सोहळ्याच्या जय्यत तयारीसाठी कार्यरत असतात़ यंदा या सोहळ्याचे स्वरूप अधिक भव्य स्वरूपात साजरे करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात स्वराज्य रक्षक छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सव सोहळ्यात सहभाग नोंदविला़ या भव्य सोहळ्याचे आयोजन अमर धरमारे, मुख्य आयोजक तथा सचिव भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश यांनी केले होते़
कार्यक्रमाला आ़ मोहन मते, राजे मुधोजी भोसले, कल्याण देशपांडे, भोजराज डुंबे, शिवानी दाणी-वखरे, डाँ़ गिरीश चरडे, देवेंद्र दस्तुरे, अजनी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार, रितेश पांडे, माजी नगरसेवक भारती बुंदे, कल्पना कुंभलकर, विशाखा बांते, वंदना भगत, मनोज गावंडे यांच्यासह हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती़
मंडळाच्यावतीने यावेळी सर्व मान्यवरांचा शाल, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला़ भव्य शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या या आयोजनाचे सर्वांनी कौतूक केले़