‘कहें… मीरा सूर कब‍िरा’ चे थाटात प्रकाशन

0

डॉ. राधा मंगेशकर यांचे पुस्‍तक अभ्‍यासपूर्ण – विष्‍णू मनोहर

नागपूर(Nagpur) :प्रसिद्ध गायिका डॉ. राधा मंगेशकर यांनी लिहिलेले ‘कहें… मीरा सूर कब‍िरा’ हे पुस्‍तक अभ्‍यासपूर्ण असून त्‍यात केलेला प्रयोग वाखाणण्यासारखा आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध शेफ विष्‍णू मनोहर यांनी केले.
डॉ. राधा मंगेशकर यांच्‍या ‘कहें… मीरा सूर कब‍िरा’ या पुस्‍तकाचे प्रकाशन प्रसिद्ध शेफ विष्‍णू मनोहर यांच्‍या हस्‍ते पुणे येथे पार पडले. पूना गेस्‍ट हाऊस येथे झालेल्‍या या कार्यक्रमाला विश्‍वकोष मंडळाचे अध्‍यक्ष डॉ. राजा दीक्षित, लेखिका डॉ. माधवी वैद्य, डॉ. म‍िलिंद भोई यांच्‍यासह गायक त्‍यागराज खाडीलकर, किशोर सरपोतदार, मंदार जोगळेकर आदींची उपस्‍थ‍िती होती.
डॉ. राधा कार्यक्रमानिमित्‍त विविध शहरांमध्ये जातात तेव्‍हा तेथील मानवी संस्‍कृती, खाद्य व गायन परंपरांचा सखोल अभ्‍यास करतात, असे या पुस्‍तकावरून दिसते असे विष्‍णू मनोहर म्‍हणाले.
डॉ. राधा मंगेशकर यांनी दहा वर्षांपूर्वी ‘कहें… मीरा सूर कबिरा’ हा कार्यक्रम सादर केला होता. त्‍यावर आधारित हे पुस्‍तक असून नवीन पिढीला जुन्‍या काळच्‍या संगीताबद्दल माह‍िती व्‍हावी, हा या त्‍यामागील उद्देश आहे