‘खडीगंमत महोत्सव’ चे शानदार उद्घाटन

0

31 मार्चपर्यंत लोककलेतून करणार प्रबोधन
सांस्कृतिक कार्य विभागाचे आयोजन

नागपूर (Nagpur), 30 मार्च 2024
महाराष्‍ट्र शासनाच्‍या सांस्‍कृतिक कार्य विभागाच्‍यावतीने 29 ते 31 मार्च २०२४ दरम्यान आयोजित करण्‍यात आलेल्‍या खडी गंमत महोत्सवाला शानदार प्रारंभ झाला. तीन दिवसीय या महोत्‍सवामध्‍ये रसिकांना महाराष्‍ट्राच्‍या विविध लोककलांचा आनंद घेता येणार आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कनव्हेक्षण सेंटर, येथे महोत्‍सवाचे उद्घाटन 29 मार्च रोजी सांस्कृतिक कार्य विभाग नागपूरचे सहाय्यक संचालक संदीप शेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जेष्ठ कलाकार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी अनेक मान्यवर मंडळी व रसिक प्रेक्षक उपस्थित होते. त्‍यानंरत शाहीर माणिकराव देशमुख यांनी ‘स्त्रीभ्रूणहत्या’ विषयावर आधारित कलेचे सादरीकरण करीत मनोरंजनातून समाजप्रबोधन केले. या कार्यक्रमाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला कार्यक्रमाचे संचालन वैदेही चवरे यांनी केले तर आभारप्रदर्शन सांस्कृतिक कार्य विभागाचे कर्मचारी कुलदीप कोवे यांनी केले.
लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे या उद्देशाने शासनामार्फत आयोजित करण्‍यात आलेल्‍या या महोत्‍सवात पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली,नागपूर ,वर्धा या जिल्ह्यातील प्रसिद्ध कलावंत खडीगंमतच्‍या माध्‍यमातून विविध विषयांवर प्रबोधन करणार आहेत.

रसिकांनी या विनामूल्‍य खडीगंमत महोत्सवाचा आस्‍वाद घ्‍यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.