

नागपूर : महाराष्ट्र आर्य वैश्य समाज व आर्य वैश्य युथ क्लब,नागपूर ,तर्फे भव्य कोमटी प्रिमियर क्विझ कॉम्पिटीशन चा ग्रँड फिनाले 22 सप्टेंबर रोजी वासवी कल्याण मंडपम येथे सम्पन्न झाला .ही तीन स्तरिय स्पर्धा, ऑनलाईन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने घेण्यात आली.सम्पूर्ण महाराष्ट्रातील आर्य वैश्य समाज बांधवांनी ह्या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला.जवळपास 101 लोकांनी स्पर्धेसाठी रजिस्ट्रेशन केले.16 वर्षांवरील सर्वांसाठी ही स्पर्धा खुली होती.4 ऑगस्ट ला ऑनलाईन पद्धतीने ह्या स्पर्धेचा पहिला राऊंड घेण्यात आला ज्यात जास्त स्कोअर असलेल्या 50 लोकांची दुसऱ्या राऊंड साठी निवड करण्यात आली.दुसरा राऊंडही ऑनलाईन पद्धतीने25 ऑगस्टला घेण्यात आला. टेक्निकल टीमची ह्यासाठी खूप मदत झाली.दुसऱ्या फेरीत 50 पैकी 18 जणांची निवड झाली ज्यांची झूम मिटिंग वर एक फेरी घेऊन फायनल 8 स्पर्धकांची निवड करण्यात आली. ह्या 8 जणांचा फायनल राऊंड 22 सप्टेंबर ला भव्य प्रमाणात सम्पन्न झाला.ह्या कार्यक्रमासाठी आर्य वैश्य समाज व समाजेतर लोकांचीही भरपूर उपस्थिती होती. पाऊन्स,बझर ,ऑडियो, व्हिडीओ आणि पिरॅमिड असे कोड्यात पाडणारे विविध 6 प्रकारचे राऊंड घेण्यात आले.ह्या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे ह्या स्पर्धेची भरघोस बक्षिसे. प्रथम बक्षीस31000 रुपये, द्वितीय बक्षीस 21000 रुपये
तृतीय बक्षीस 11000 रुपये. सोबतच सर्व स्पर्धकांनाही विशेष बक्षीसे देऊन सन्मानित करण्यात आले. बेंगलोर येथील क्विज् मास्टर प्रणव पारसवार यांनी हा क्विज कॉम्पिटिशन घेतली ह्या सम्पूर्ण कार्यक्रमाला आर्य वैश्य समाज नागपूर चे अध्यक्ष श्री गणेश चक्करवार, सचिव श्री राजू मुक्कावार व महिला उपाध्यक्षा सौ .सायली पत्तीवार ह्यांचे मार्गदर्शन लाभले या प्रोजेक्टची संकल्पना सायली पत्तीवार यांची होती.ह्या सोबतच आर्य वैश्य युथ क्लब चे अध्यक्ष श्री.स्वप्निल कल्लूरवार व सचिव श्री स्वप्नील डुबेवार ह्यांचे ही वेळोवेळी सहकार्य लाभले.विविध प्रायोजकांनी ह्या स्पर्धेला एकदम भव्य स्वरूप आणले . कार्यक्रमाचे संचालन श्रीकुमार झिलपिलवार यांनी केले ह्या सम्पूर्ण स्पर्धेचे नियोजन IT मध्ये क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रोजेक्ट डायरेक्टर्सनी अगदी व्यवस्थित पार पाडले. ज्यात प्रामुख्याने सौ .श्रेया पत्तीवार, सौ.वंदना नालमवार,सौ स्नेहल गोगुलवार,सौ .पूजा गादेवार. सौ.वासवी गन्धमवार.सौ रीमा डुबेवार,सौ. अनुजा नालमवार, श्री राजेश ओलालवार, श्री सारंग कंचरलावार , श्री सुश्रुत पत्तीवार ह्यांनी विशेष मेहनत घेतली.