

गडचिरोली (gadchiroli) दिनांक ५ आगष्ट २०२४ रोज मंगळवारला मा मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या दालनासमोर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना एन जि पी ५८२५ चे राज्याध्यक्ष श्री विलासजी कुमारवार (State President of Maharashtra State Gram Panchayat Workers Sena NGP 5825 Shri Vilasji Kumarwar)यांचे नेतृत्वात ठ्ठिया आंदोलन व मोर्चा आयोजित करण्यात आला .
सदर आंदोलन हे ग्राम पंचायत कर्मचारी यांच्या अनेक प्रलंबित मागण्या संदर्भात असून त्यामध्ये प्रामुख्याने सुधारित दरानुसार वेतन अनुदान ५०% , ७५% , १०० % शासन अनुदान ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे परंतु शासन अनुदान व्यतिरिक्त ग्रामपंचायत हिश्याची वेतनापोटी देय असलेली उर्वरित रक्कम २५% , ५०% रक्कम देण्यास बऱ्याच ग्रामपंचायत टाळाटाळ करीत आहे. बहुसंख्य कर्मचार्याच्या वेतानासोबत द्यावयाची राहणीमान भत्याची रक्कम कर्मचाऱ्यांना दिले जात नाही अशा ग्रामपंचायतीवर प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी .
किमान वेतनाच्या ८.३३ % रक्कम कर्मचारी हिस्सा व ८.३३ % रक्कम ग्रामपंचायत हिस्सा कर्मचार्याच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात जमा करण्याबाबत शासन निर्णय आहे परंतु अनेक ग्रामपंचायती ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करत नाही . ग्रामपंचायतिच्या वसुलीची जबाबदारी हि ग्रामसेवक /ग्रामविकास अधिकारी / सरपंच व पदाधिकारी यांची असताना ग्रामपंचायत कर्मचारी वेतनाकरिता वसुली अट लादण्यात आलेली आहे , सदर वसुलीची अट तत्काळ रद्द करण्यात यावी .
दिनांक ०४/०१/२०१८ नुसार ग्राम पंचायत कर्मचार्यांना अपघात विमा उतरविण्याचे शासन निर्णय आहे परंतु जिल्ह्यात एकाही ग्राम पंचायत कर्मचार्याचे अपघात विमा ग्रामपंचायतच्या वतीने उतरविण्यात आलेला आही . जिल्हा परिषद सेवेत ग्राम पंचायत कर्मचार्यांना १०% पदभरती नियमित करण्यात येत नाही . कोविड १९ अंतर्गत कोरोना काळात काम करणाऱ्या ग्राम पंचायत कर्मचार्यांना कोरोना संपेपर्यंत दर महा १००० रु प्रमाणे प्रोत्साहन भत्ता अदा करण्यात यावे असे शासन निर्णय असून त्यानुसार जिल्हातील कर्मचार्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात आलेला नाही .
तसेच ग्रामपंचायत कर्मचार्याच्या सेवा पुस्तिका अद्यावत ठेवण्याची जबाबदारी हि संबंधित ग्रामसेवक असून ग्राम पंचायत कर्मचार्यांचे सेवा पुस्तिका अद्यावत नाही . सेवा पुस्तिकेत कार्म्च्यार्याचे अर्जित रजा , वाढीव राहणीमान भत्ता , सुधारित किमान वेतन व इतर नोंदी जिल्हातील ग्रामपंचायत कर्मचार्याच्या सेवा पुस्तिकेत नोंद करण्यात आलेल्या नाही . सुधारित किमान वेतनानुसार थकीत असलेले १९ महिन्याचे वेतन अद्यापहि अदा करण्यात आलेले नाही . त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचार्यांना नगरपरिषद व जिल्हा परिषद कर्मचार्याप्रमाणे चतुर्थ श्रेणी लागू करण्यात यावी , अश्या विविध मागण्या घेऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता जिल्हातील ३०० च्या वर ग्रामपंचायत कर्मचारी ठिय्या मांडून बसले होते .
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने अनेकदा या संदर्भात निवेदने जिल्हा प्रशासन व शासन स्तरावर देऊनहि दखल घेण्यात आलेली नाही त्यामुळे ५ ऑगष्ट २०२४ ला जिल्ह्यातील बहुसंख्य ग्राम पंचायत कर्मचारी सकाळी १० वाजेपासून जिल्हा परिषद गडचिरोली च्या कार्यालासमोर येऊन बसले असता ग्रामपंचायत कर्मचार्याच्या वतीने प्रशासन व शासनकर्त्या विरोधात तीव्र नाराजी वक्त करून निषेध जाहीर करण्याकरिता जोरदार घोषणा करून जिल्हा परिषदचा परिसर हादरून सोडला , या संघटनेचे राज्याधाक्ष श्री विलासजी कुमारवार यांनी मार्गदर्शन करतांनी सांगितले कि अधिकाऱ्याकडून या संदर्भात अनेक तालुका अधिकार्यांना पत्रव्यवहार करण्यात येतो परंतु त्याची कोणीही दखल घेत नाही , अनेक शासन निर्णयाची अंमलबजावणी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत नाही त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या समस्या मार्गी लागत नाही. ग्राम पंचायत कर्मचारी हे अत्यंत गरीबीचे जीवन जगत असून प्रशासन व शानच्या भोंगळ कारभारामुळे
या कर्मचाऱ्यावर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी योग्य ते पाउल उचलून कार्यवाही करावी व न्याय देण्यात यावा असे मार्गदर्शन केले तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी यांना विनंती केली कि २.०० वाजेपर्यंत आमच्या मागण्या संदर्भात चर्चेला येऊन समस्या निकाली काढण्यात याव्या अन्यथा आम्ही आपल्या कार्यालयात येऊन ठिय्या आंदोलन करू असे सांगितले , परंतु बराच वेळ निघूनही कोणीही चर्चेला आलेला नाही किवा चर्चेला बोलविण्यात आले नाही त्यामुळे ठरल्याप्रमाणे ठीक २.०० वाजे ३०० च्या वर कर्मचार्यांनी आपला मोर्चा मा मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या दालनाकडे वळवला व घोषणांनी जिल्हा परिषद परिसर दणाणून सोडला , पोलीस प्रशासनाने थांबविण्याचे प्रयत्न केले परंतु अन्यायग्रस्त कर्मचार्यांनी आपला मोर्चा कार्यालयाकडे आगेकूच केला व मा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत ) यांच्या दालनासमोर सर्व कर्मचारी ठ्ठिया मांडून बसले . त्यामुळे काही काळ संपूर्ण जिल्हा परिषद कार्यालय दणाणला , ग्रामपंचायत कर्मचार्यांची संख्या व रोष पाहून प्रशासनाला अधिकचे पोलीस पाचारण करावे लागले . परंतु जो पर्यंत आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही तोपार्तांत आम्ही उठणार नाही असे निर्धार केल्या मुळे मा श्री कणसे साहेब उपमुख्यकार्यकारी अधिकारी पंचायत व श्री शेलार साहेब यांनी ग्रामपंचायतच्या शिष्ट मंडळास आपल्या चेंबरमध्ये बोलविण्यात आले . त्यानंतर संघटनेचे पदाधिकारी व प्रशासन यांच्यात बैठक घडून आली .
या बैठकीत मा राज्याध्यक्ष श्री विलासजि कुमारवार यांनी विविध मागण्या संदर्भात व समस्येवर ग्राम पंचायत कर्मचार्यांची बाजू धरून लेखी पात्र देण्याचे सुचविले असता मा श्री कणसे साहेब , व मा श्री शेलार साहेब यांनी सूचित केले कि जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत निहाय व कर्मचारी निहाय समस्या लेखी स्वरुपात द्याव्या त्यानंतर आम्ही आपल्याला लेखी माहिती कळवू त्यानंतर जिल्हातील उपस्थित ३०० कर्मचार्यांनी वेतन , राहणीमान भत्ता , भविष्य निर्वाह निधी रक्कम, कोरोना प्रोत्साहन भत्ता , अपघात विमा , वसुलीची अट , सेवा पुस्तिका , या संदर्भात असलेल्या सर्व समस्या लेखी लिहून दिल्या . त्यानंतर मा . कणसे साहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत यांनी सर्व मागण्या संदर्भात संबंधित तालुका अधिकारी , ग्रामसेवक यांना प्राप्त झालेल्या सर्व समस्येवर कार्यवाही साठी पत्र देऊन अहवाल मागविण्यात येईल व आपल्या सर्व समस्या मार्गी लावून देण्यात येईल असे लेखी पत्र देऊन मोर्चा मागे घेऊन स्थगित करण्यात यावे अशी विनंती केली.
त्यामुळे सर्व कर्मचार्यांनी आंदोलन मागे घेण्याचे ठरविले यांनतर राज्याध्यक्ष मा विलासजी कुमरवार यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना एन जि पी ५८२५ च्या वतीने आभार वक्त करून हे आंदोलन मागे घेण्यात येत आहे असे घोषित केले. या आंदोलनाचे मुख्य नेतृत्व राज्याध्यक्ष श्री विलासजी कुमरवार , श्री सुनील गेडाम जिल्हा सचिव , श्री योगेश ढोरे जिल्हा उपाध्यक्ष , श्री संतोष यादव जिल्हा सदस्य , श्री प्रदिप तुपट जिल्हा प्रसिद्धी प्रमुख , श्री फुलचंद जांभूळकर जिल्हा कार्याध्यक्ष श्री रवींद्र सेगम जिल्हा संघटक , श्रीमती वैशाली तावडे राज्य सदस्य , श्रीमती गीता कुनघाडकर महिला प्रसिद्धी प्रमुख , श्रीमती रेखा देरकर महिला आघाडी अध्यक्ष , सर्व जिल्हा पदाधिकारी , तालुका पदाधिकारी यांनी केले या आंदोलनात जिल्हातील ३०० हून अधिक ग्रामपंचायत सहभागी झाले होते .