सरकार निघाले ग्रामीण भागात दौऱ्यावर

0

नागपूर – राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात  State Legislature Winter Session पहिल्याच दिवशी विरोधक अवकाळी पाऊस आणि शेतकरी प्रश्नी आक्रमक झाल्यावर तातडीने सरकार नुकसान पाहणीसाठी दौऱ्यावर निघाले.नागपूर जिल्ह्यातील क्षतीग्रस्त भागातील पिकाच्या नुकसानीच्या पाहणी दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जायस्वाल, आ. टेकचंद सावरकर, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर यांच्यासह कृषी, पणन, महसूल विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. सरकार शेतकऱ्यांसाठी नक्कीच सकारात्मक असून विदर्भ, मराठवाडा दिलासा देईल असा विश्वास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी बुधवारी चहापान आटोपल्यावर माध्यमांशी बोलताना व्यक्त केला होता.