सरकार शेतकऱ्यांना आत्महत्येसाठी प्रेरित करत आहे – नाना पटोले

0

 

नागपूर – ड्रग्ज प्रकरणात वेगाने तपास व्हावा, ललित पाटील प्रकरणात संजीव ठाकूर यांना अटक करा
संजीव ठाकूर यांना अटक झाली पाहिजे, ठाकूरांना कोणत्या मंत्र्यांचे फोन येत होते? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.
तानाशाही प्रवृत्तीचं हे सरकार आहे मराठा-ओबीसी समाजात सरकारने संघर्ष निर्माण केला आहे.सरकारमुळे मराठा-ओबीसींमध्ये दरी वाढत आहे
आमच्या नेत्यांकडून वारंवार जातीनिहाय जनगणनेची मागणी होत आहे .शैक्षणिक व्यवस्थेविरोधात भाजप प्रणित सरकार असल्याचा आरोप करीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वक्तव्याचा निषेध केला. मराठा ओबीसी मधील वादाला सरकार जबाबदार आहे
– भाजपचे नेते, मंत्र्यांनी वारंवार शिवरायांचा अपमान केला,सरकारला आणखी किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या हव्यात?सरकार अजून पंचनामेचं करत आहे.
सरकार शेतकऱ्यांना आत्महत्येसाठी प्रेरित करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला.