गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस ‘अॅडव्हांटेज विदर्भ २०२५’ मध्ये सहभागी होणार

0

नागपूर (Nagpur), महाराष्ट्र – ५ फेब्रुवारी २०२५ –

गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस (जी इ एम) ७ ते ९ फेब्रुवारी २०२५ दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, कॅम्पस ग्राउंड, अमरावती रोड येथे होणाऱ्या ऍडव्हांटेज विदर्भ २०२५ च्या मध्ये सहभागी होणार आहे.

नागपूरच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि सार्वजनिक खरेदी क्षेत्रात स्थानिक एमएसई आणि उद्योगांना चालना देण्याच्या उद्देशाने जीइएम या ऍडव्हांटेज विदर्भ च्या पॅव्हेलियनमध्ये (स्टॉल क्रमांक बी-७६) मोफत नोंदणी मोहीम राबवणार आहे. योग्य आणि त्वरित मदतीसाठी हा प्लॅटफॉर्म असून विदर्भतील विक्रेता आणि सेवा प्रदाता मदत व्हावी आणि सार्वजनिक खरेदी बाजारपेठेत व्यवसाय करण्याची सोय व्हावी हा मागील उद्देश आहे.

“या आर्थिक वर्षाच्या १० महिन्यांत, जी इ एम ने ₹ ४.०९ लाख कोटींचे एकूण व्यापारी मूल्य गाठले आहे. “जी इ एम वर व्यवहार केलेल्या एकूण ऑर्डर मूल्यापैकी जवळजवळ ४०% रक्कम सूक्ष्म आणि लघु उद्योगांनी (एम एस ई) पूर्ण केली आहे. जी इ एम ला ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’ मध्ये सहभागी होण्याची उत्सुकता आहे त्यामुळे जी इ एम ला अधिक समावेशक बाजारपेठ बनवता येईल आणि या प्रदेशातील घरगुती उद्योगांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देता येतील,” असे जी इ एम चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य विक्रेता अधिकारी अजित बी. चव्हाण म्हणाले.

असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, नागपूर द्वारे आयोजित हा उपक्रम सार्वजनिक खरेदीमध्ये लघु-स्तरीय विक्रेत्यांचा सहभाग वाढवण्यासाठी जी इ एम च्या काही प्रमुख उपक्रमांचे आणि योजनांचे प्रदर्शन करणार आहे. ऍडव्हांटेज विदर्भ 2025 मध्ये जी इ एम चा सहभाग पोर्टलच्या व्यापक अवलंबनास प्रोत्साहन देईल, ज्यामुळे भारत सरकारच्या “आत्मनिर्भर विकसित भारत @ २०४७” च्या दृष्टिकोनाला बळकटी मिळेल.