दिव्यांगा कौशल्य विकास मल्टीपर्पज सोसायटी चंद्रपूर कडून, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर यांना पाच व्हीलचेअर देणगी स्वरूपात प्राप्त

0
Chandrapur map Chandrapur in which district Chandrapur tourist places Chandrapur is famous for Chandrapur Pin Code Chandrapur area Chandrapur tourism
Chandrapur map Chandrapur in which district Chandrapur tourist places Chandrapur is famous for Chandrapur Pin Code Chandrapur area Chandrapur tourism

 

चंद्रपूर (Chandrapur) :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूरला दिव्यांग कौशल्य विकास मल्टीपर्पज सोसायटी चंद्रपूरकडून पाच व्हील चेअर देणगी रूपात नुकतेच प्राप्त झाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ मिलिंद कांबळे, क्षयरोग विभागाचे विभागप्रमुख डॉ भडके, वैद्यकीय महाविद्यालयाचे उपवैद्यकीय अधीक्षक डॉ अमित प्रेमचंद, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ भास्कर सोनारकर, शरीररचनाशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ कुलेश चांदेकर तसेच दिव्यांग कौशल्य विकास मल्टीपर्पज सोसायटी चे अध्यक्ष श्री निलेश पाझारे मंचावर उपस्थित होते. या सर्वांचे उपस्थितीत वॉर्ड परिसेविका यांचेकडे व्हीलचेअर सुपूर्द केल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना समाजसेवा अधीक्षक श्री राकेश शेंडे यांनी श्री निलेश पाझारे यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देऊन त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक व दिव्यांग बांधवांसाठी करत असलेल्या कार्याची ओळख करून देऊन रुग्णालयात व्हीलचेअर चे असलेले महत्त्व विशद केले. याप्रसंगी उपस्थित असलेले अधिष्ठाता डॉ मिलिंद कांबळे यांनी आपल्या मनोगतनातून रुग्ण हित समोर ठेवून पाच व्हीलचेअर देणगी रूपात दिल्याबद्दल दिव्यांग कौशल्य विकास मल्टीपर्पज सोसायटी चे अध्यक्ष श्री निलेश पाझारे यांचे आभार मानले. व या व्हीलचेअर आरोग्य सेवा देताना खूपच महत्त्वाच्या असल्याचे बोलले. याप्रसंगी श्री निलेश पाझारे यांनी रुग्णालयातील व्हीलचेअर ची गरज ओळखून व्हीलचेअर देणगी स्वरूपात देत असल्यामुळे आनंद होत असून यापुढेही आपण छोट्या मोठ्या रुग्ण उपयोगी वस्तू देणगी म्हणून देत राहू असे आश्वस्त केले.

देणगी स्वरूपात व्हील चेअर मिळण्याकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ मिलिंद कांबळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ निवृत्ती जीवने यांचे मार्गदर्शनाखाली समाजसेवा अधीक्षक श्री राकेश शेंडे यांनी श्री निलेश पाझारे यांच्याशी संपर्क साधून देणगी स्वरूपात पाच व्हीलचेअर प्राप्त करून देण्यात आल्या. शहरातील दानशूर संस्था व दानशूर व्यक्ती यांनी रुग्ण हित समोर ठेवून सामाजिक उत्तरदायित्वासाठी पुढे यावे असे आवाहन याप्रसंगी मान्यवराकडून तसेच समाजसेवा विभागाकडून करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजसेवा अधीक्षक तानाजी शिंदे, तर मान्यवरांचे आभार समाजसेवा अधीक्षक उमेश आडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजसेवा अधीक्षक सर्व श्री भास्कर झळके, राकेश शेंडे, उमेश आडे, हेमंत भोयर, भूषण बारापात्रे, तानाजी शिंदे, मिलिंद बहादे, नागेश मेश्राम, सचिन सहारे यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाला बहुसंख्येने अधीपरिचारिका, परिसेविका उपस्थित होते.