
-शिंदे-फडणवीस Shinde-Fadnavis सरकार ३१ डिसेंबरपर्यंत पडणार असल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडून हा दावा सातत्याने सुरु असून त्याला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उत्तर दिले आहे. नार्वेकर म्हणाले की, आमदारांना अपात्र ठरविण्याचा अधिकार आदित्य ठाकरेंन नाही. त्यांनी केलेली भविष्यवाणी घटनेच्या तरतुदींच्या विरोधात आहे. सरकार पडायचे असेल तर ते सभागृहाती संख्याबळाच्या भरवश्यावर पडत असते व कोणी म्हणते म्हणून सरकार पडत नाही, असेही नार्वेकर म्हणाले. (Rahul Narvekar)
नार्वेकर म्हणाले, सभागृहात अविश्वास ठराव झाल्यानंतर संख्याबळ कमी असेल तर ते सरकार पडते. बाहेर कोण, काय बोलतोय म्हणून सरकार पडत नसते. सरकारने बहुमताचा आकडा सभागृहात पार केला आहे. संख्याबळाच्या जोरावर या सरकारने बहुमताची अग्निपरीक्षा पास केली आहे. संविधान दिनीच उगाचच कोणीतरी असंवैधानिक विधाने करू नयेत, असा टोला त्यांनी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांना लगावला. अपात्रतेच्या मुद्यावर निकाल देण्यास विलंब केला जात असल्याचा ठाकरेंचा आरोपही त्यांनी फेटाळला.