RBI बँकेच्या संचालकांची दि धरमपेठ महिला मल्टिस्टेट संस्थेला सदिच्छा भेट

0
RBI

 

नागपूर (Nagpur) दि. 05/11/2024 :- एक लाख सोळा हजाराच्या वर सभासद असणारी व 2200 कोटींच्यावर व्यवसाय पूर्ण करणारी, सर्व क्षेत्रात भारतात आघाडीवर असलेली दि धरमपेठ महिला मल्टिस्टेट को. ऑप. संस्थेने 30 वर्षे पूर्ण करुन 31 व्या वर्षात पदार्पण केले आहे. अशा नामांकित संस्थेला आज दि. 5 नोव्हेंबर 2024 रोजी संस्थेच्या रामनगर येथील सिताराम भवन मुख्य कार्यालयात भारतीय रिझर्व बँकेचे नागपूर क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक मा. श्री. सचिनजी शेंडे यांनी सदिच्छा भेट दिली. तसेच त्यांच्यासोबत भारतीय रिझर्व बँकेचे संचालक मा. श्री. सतिशजी मराठे, सहकार भारतीचे गहाराष्ट्र प्रदेश महामंत्री मा. श्री. विवेकजी जुगादे, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. दिनानाथजी ठाकुर, सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री मा. डॉ. उदय जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.

संस्थेच्या अध्यक्षा सौ. निलिमा बावणे यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला व संस्थेच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली. मा. श्री. सचिनजी शेंडे यांनी संस्थेच्या आर्थिक व्यवसायाचा आढावा घेऊन संस्थेच्या होत असलेल्या प्रगतीबद्दल त्यांनी प्रशंसा केली व उत्तरोत्तर प्रगती होईल, असे त्यांनी उद्‌गार काढले. संस्थेची आर्थिक प्रगती लक्षात घेता संस्था लवकरच सोसायटी गधून बँकेमध्ये परिवर्तित होईल, अशी आशा सौ. निलिमा बावणे यांनी व्यक्त केली. बँकेमध्ये पदार्पण होण्याकरीता लागणा-या सर्व कागदपत्रांची पुर्तता करीत असल्यामुळे सदर संस्था लवकरच बँकेत पदार्पण करेल, असा आशावाद उपस्थितांनी व्यक्त करीत संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळास त्यांनी शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा सौ. निलिगा बावणे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चंद्रशेखर वसुले, सिनिअर मॅनेजर अस्मिता बावणे उपस्थित होते.