श्री गोविंददेव गिरी महाराज यांची श्रीगुरुमंदिरला सदिच्छा भेट

0

 

(Nagpur)नागपूर, 26 ड‍िसेंबर
श्रीगुरुमंदिर, जयप्रकाशनगर येथे श्रीदत्तजयंती उत्‍सव सोहळा सुरू असून आज मंगळवारी अयोध्‍या येथील श्रीराम जन्‍मभूमी न्‍यासाचे कोषाध्‍यक्ष आचार्य (Shri Govinddev Giri Maharaj)श्री गोविंददेव गिरी महाराज यांनी सदिच्‍छा भेट दिली. धर्मभास्‍कर सद्गुरुदास महाराजांनी त्‍यांचे स्‍वागत केले.

यावेळी छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजेय देशमुख प्रामुख्‍याने उपस्‍थ‍ित होते. अजेय देशमुख यांनी यावेळी ‘हर घर शिवचरित्र’ या 350 व्या शिवराज्याभिषेक निमित्त सुरू असलेल्या अभिनव उपक्रमाची त्‍यांना माहिती दिली. आजच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र हे आता धार्मिक व्यासपीठावरून मांडणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन गोविंददेव ग‍िरी महाराजांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज हे कलियुगातील श्रीराम असल्‍याचे सांगत त्‍यांनी सद्गुरुदास महाराजांच्‍या कार्याचे कौतुक केले. ते म्‍हणाले, सद्गुरूदास महाराजांनी प्रथम शिवाजी महाराजांच्‍या कार्यावर प्रकाश टाकला व आता उपासनेच्‍या माध्‍यमातून राष्‍ट्रजागरणाचे कार्य ते करीत आहेत. यावेळी (Ajay Deshmukh) अजेय देशमुख यांना 50 व्या वाढदिवसनिमित्त (Shri Govind Dev Giri Maharaj)श्री गोविंद देव गिरी महाराज यांनी आशीर्वाद दिले.

आज रंगला पालखी सोहळा

श्री गुरुमंदिर परिसरात आज पालखी सोहळा रंगला. श्री दत्तात्रेयाच्या पालखीमुळे जयप्रकाशनगरातील वातावरण दत्तमय झाले. सकाळी ठीक ६ वाजता श्री गुरूमंदिर येथून पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. सडा रांगोळ्यांनी सजलेल्‍या मार्गावरून पालखीने मार्गक्रमण केले. प्रत्येक घरातून पालखीचे ओवाळून व पुष्पव्रुष्टी करून स्वागत करण्‍यात आले. तपोवन, गजानन महाराज मंदिर, महालक्ष्मी मंदिर, श्रीराम मंदिर येथे पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले. भाविकांनी भजन, जयजयकार करत फेर धरला. दुपारच्‍या सत्रात धर्मभास्कर सद्गुरुदास महाराजांच्‍या उपस्थितीत दत्तजन्म सोहळा पार पडला. कल्याण पुराणिक गुरुजींनी श्री गुरूचरित्रातील दत्तजन्म अध्याय पठण केला. त्यावेळी भाविकांनी गुलाल, फुले उधळून दत्त नामाचा जयजयकार केला. भाविकांनी पाळणा म्हटला. ३ लहान मुले त्रेमुर्ती बनले होते व छोटी बालिका अनुसया रुपात सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. शेकडो लोकांनी शिस्तीत रांगेत दर्शन घेऊन प्रसाद ग्रहण केला.