

७० वर्षे पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांसाठी खूषखबर आहे. आता केंद्र सरकारनं ७० वर्षे पुर्ण झालेल्या सर्व नागरिकांना आता ५ लाख रूपयांचं मोफत विमा कवच देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं नुकताच घेतलाय . याला कोणत्याही उत्पनाची अट नाही . या निर्णयाचा फायदा ६ कोटी लोकांना मिळणार आहे.
त्यातही जर तुमचा कुठलाही इतर पाच लाखाचा विमा असेल तर दोन्ही विमा मिळून दहा लाख रुपये पर्यंतचा विमा ७० वर्षे पूर्ण झालेल्या मिळू शकतो. योजनेचा लाभ तुम्ही कसा घेऊ शकता कोणती कागदपत्र लागणार ते जाणून घेऊयात.
कुटुंबातील किती लोकांना मिळणार विमा ?
या संदर्भात कुटुंबातील गरजू जेवढे सदस्यातील तेवढ्यांना हा विमा मिळण्यासाठी ते पात्र ठरतील . एका कुटुंबात आता एकापेक्षा अधिक आयुष्यमान कार्ड देखील होऊ शकतात.
योजनेचे लाभार्थी कोण असणार?
आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गत देशातल्या सर्वच ७० वर्षावरील नागरिक असतील. तसेच निराधार नागरिक, आदिवासी, दलित तसेच दिव्यांग नागरिक आणि जे असंघटित क्षेत्रात काम करणारे मजूर असतील ते देखील यासाठी पात्र आहेत. ऑनलाइन pmjay.gov.in ह्या संकेत स्थळावर अर्ज करून पात्र आहे किंवा नाही हे देखील समजू शकतं.
केंद्र सरकारच्या योजनेचे लाभार्थी सुद्धा लाभ घेऊ शकतात .या योजनेचा लाभ जेष्ठ नागरिक आधीपासून केंद्र सरकारची आरोग्य योजना (CGHS) घेत आहेत जे माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ECHS )घेत आहेत आणि जे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAF)तसेच इतर सार्वजनिक आरोग्य विम्याचा लाभ घेणारे देश नागरिक सुद्धा पात्र असतील.
अर्ज कसा आणि कुठे करायचा?
यासाठी केंद्र सरकारच्या अधिकृत www.pmjay.gov.in वेबसाईटवर भेट द्यावी . अधिकृत वेबसाईटच्या होम पेजवर
Am I Eligible या ठिकाणी क्लिक करावे
त्यानंतर अर्जदाराच्या आधारशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकासाठी ओटीपी मागवावा
वेबसाईटच्या स्क्रीनवर ऑप्शनमध्ये आपल्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी भरावा
स्क्रीनवर आपण ज्या राज्यामध्ये राहतो ते राज्य निवडावे
पुन्हा आपला दहा अंकी मोबाईल क्रमांक आणि रेशन कार्ड क्रमांक नमूद करावा
वेबसाईटच्या स्क्रीनवर पात्रतेची माहिती झळकेल
या ठिकाणी कार्ड बनवण्यासाठी संपर्क साधा
या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने सुरू केलेला टोल फ्री क्रमांक १४५५५५ यावर देखील आपली पात्र अपात्र माहिती मिळवू शकतात.
किंवा कॉमन सर्विस सेंटर (CSC)अर्थात सीएससी सेंटरवर देखील अधिकृत कागदपत्र देऊन अर्ज करता येईल.
कोणती कागदपत्रे लागणार?
या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अधिकृत आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र रेशन कार्ड आणि आधारशी जोडलेला ॲक्टिव्ह मोबाईल क्रमांक आवश्यक. त्यासाठी कोणत्याही उत्पन्नाच्या मर्यादेची अट नाही.पात्रधारकांनी नक्की अर्ज करा.