Gondwana University Gadchiroli : कँरि आँन चा निर्णय विद्यार्थी हिताचा

0
Gondwana University Gadchiroli : कँरि आँन चा निर्णय विद्यार्थी हिताचा
gondwana-university-gadchiroli-kari-anns-decision-is-in-the-interest-of-students

व्यवस्थापन परिषद सदस्य गुरुदास कामडी

गडचिरोली (Gadchiroli) :- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली ने २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उन्हाळी २०२४ परिक्षांचे निकाल जहीर करण्यात आले आहेत. परंतू निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना परिक्षेत यश न मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये निराशा पसरली होती. अनेक विद्यार्थ्यांचे मागील सेमिस्टर पेपर बँक राहिल्यामुळे पुढील सेमिस्टर व वर्षाकरिता प्रवेशा पासून वंचित राहण्याची वेळ यामुळे निर्माण झाली होती.

यामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षणात खंड पडून, महाविद्यालयीन विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये. याच हेतूने गोंडवाना विद्यापीठाचे मा.कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी विद्यार्थी हितासाठी कँरि आँन ची सुविधा शैक्षणिक सत्र २०२४-२५ करिता लागू करण्याचा निर्णय घेतला. याबद्दल गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे व्यवस्थापन परिषद-अधिसभा सदस्य गुरुदास कामडी यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. मा कुलगुरूंनी विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्यामुळे त्यांचे अभिनंदन केले आहे.

उन्हाळी २०२४ घेण्यात आलेल्या परिक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये निराशा निर्माण झाली होती. विविध अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशापासून वंचित रहाण्याची भिती निर्माण झाली होती., (Gondwana University Gadchiroli) गोंडवाना विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद-अधिसभा सदस्य यांच्या कडे कँरि आँन सुविधा मिळण्यासंदर्भात मागणी केली होती. परिक्षेतील अपयशामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये .विद्यार्थ्यांचा शिक्षणात खंड पडून ,तो उच्च शिक्षणापासून दूर जावू नये. याच उद्देशाने व्यवस्थापन परिषद सदस्य गुरुदास कामडी विद्यापीठाचे मा.कुलगुरू, परिक्षा नियंत्रक,विद्या परिषद व अभ्यास मंडळाकडे मागणी लावून धरली होती. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणात खंड पडून तो शिक्षणापासून वंचित राहू नये या उदात्त हेतूने कँरि आँन सुविधा शैक्षणिक सत्र २०२४-२५ करिता गोंडवाना विद्यापीठाचे परिपत्रक क्रमांक जा.क्र. गो.वि./ परिक्षा वि./३४६७/२०२४ दि.५ सप्टेंबर २०२४ नुसार लागू करण्याचा निर्णय लागू केला त्या बद्दल विद्यापीठ प्रशासनाचे सर्व विद्यार्थ्यांनी आभार व्यक्त कले आहे.

Gadchiroli wikipedia in marathi
Why Gadchiroli is dangerous
Gadchiroli is famous for
Gadchiroli Map
Gadchiroli Collector Name list
www.gadchiroli.gov in
www.gadchiroli.nic.in 2024
Gadchiroli Collector name 2024