विविध मागण्यांसाठी स्वस्त रेशन दुकानदार बेमुदत संपावर

0

गोंदिया  GONDIYA – केंद्र आणि राज्य सरकारच्या सामान्य माणसांपर्यंत विविध योजना पोहचाव्या, विविध योजनांतर्गत धान्य, गहू, साखर इतर साहित्य ही लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी स्वस्त रेशन दुकानदार हे फार महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी गोंदिया जिल्ह्यातील 999 स्वस्त रेशन धान्य दुकानदारांनी बेमुदत संप पुकारला आहे. गोंदिया येथील शासकीय इमारतीसमोर तसेच जिल्ह्यातील तालुक्यात धरणे आंदोलन केले. निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे. केंद्र आणि राज्य सरकारद्वारा 14 सूत्रे कार्यक्रम मंजूर करावा, स्वस्त धान्य दुकानदारांचे कमिशन वाढवून देण्यात यावे, घर किराया देण्यात यावा, धान्यतील तूट भरून देण्यात यावी,

अशा विविध मागण्यांसाठी संपूर्ण दुकानदार हे संपावर गेले आहेत. त्याचं अनुसार गोंदिया जिल्ह्यातील 999 स्वस्त धान्य दुकानदार हे सुध्दा संपावर गेले आहेत. भारतामध्ये पाच लाखाच्यावर स्वस्त धान्य दुकानदार असून आपल्या विविध मागण्यांसाठी सरकारला एक डिसेंबरला निवेदन देऊन त्यांच्या मागण्या एक महिन्यांच्या आत पूर्ण कराव्या असे निवेदन दिले होते. परंतु एक महिना लोटूनही अद्यापही मागण्या पूर्ण न झाल्याने सर्व स्वस्त धान्य दुकानदार हे बेमुदत संपावर बसले असून एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याची भूमिका व्यक्त केली.