
गोंदिया GONDIYA : शेताजवळील कुपणात वीज प्रवाहित करुन जनावरांची शिकार करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरु होते. मात्र, या प्रयत्नात त्यांना विजेचा जोरदार धक्का बसून दोघेही स्वतःच मृत्यूमुखी पडल्याची घडना गोंदिया जिल्ह्यात गोरेगाव पोलिस हद्दीतील कटंगी येथे उघडकीस आली. Sampath Valthare (age 48) and Ghanshyam Valthare (age 32) संपत वलथरे ( वय ४८) व घनश्याम वलथरे ( वय ३२) अशी मृतांची नावे असून दोघेही कटंगी येथील रहिवासी होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कटंगी येथे शेतातील कुंपणाला वीज प्रवाह जोडून जनावरांची शिकार करण्याची योजना या दोघांनी आखली होती. त्यासाठी वीज घेण्यासठी दोघांनी शेताजवळील उघड्या रोहित्राचा उपयोग करायचे ठरवले. रोहित्रातून वीज घेताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. यात दोघांचाही मृत्यू झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. यासंदर्भात पोलिसांच्या सूचनेवरून महावितरणच्या दोन लाईनमननी घटनास्थळी जाऊन तपासणी केली असता मृतांनी जनावरांच्या शिकारीकरिता रोहित्रात आकोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांना आढळले. मात्र, त्यांनाच विजेचा धक्का बसल्याचे महावितरणचे अभियंता विनीत वहाने यांनी सांगितले.