Gondia News : अस्तित्वासाठी जंगलाच्या दोन वाघांची झुंज

0
Gondia News : अस्तित्वासाठी जंगलाच्या दोन वाघांची झुंज
gondia-news-two-jungle-tigers-fight-for-existence

 

गोंदिया (Gondia) :- वाघ आपल्या अस्तीत्वासाठी दुसऱ्या वाघाशी झुंज करतो. ह्या नैसर्गीक नियमाची प्रचिती २२ सप्टेंबर रोजी आली. दोन वाघांच्या झुंजीत तरूण वाघाने वृध्द वाघावर हल्ला करून त्याला ठार केले. ही घटना रात्रीच घडली असावी. २२ सप्टेंबर रोजी सकाळी वनकर्मचारी गस्तीवर गेले असतांना त्यांना ११ ते १२ वर्ष वयेागटातील वाघ गंभीर जखमी अवस्थेत मृतावस्थेत आढळला.

वनपरिक्षेत्र नागझिरा अभयारण्य अंतर्गत सहवनक्षेत्र नागझिरा संकुल, नियत क्षेत्र नागझिरा १, कक्ष क्र. ९६ मधील मंगेझरी रोड नागदेव पहाडी परिसरात बिटरक्षक जे.एस. केंद्र, नागझिरा १ हे आपल्या चमूसह नियमीत गस्ती वर असतांना साधारणतः सकाळी १० वाजता नर वाघ ९ ते १० वर्षाचा मृतावस्थेत आढळला. या घटनेची माहिती बिटरक्षक केंद्रे यांनी तत्काळ वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना दिली. नागझिरा अभयारण्याच्या आजूबाजूला फिरणाऱ्या नवीन वाघाने नागझिरा अभयारण्याच्या आत नागझिरा चौकशी सेंटरच्या जवळ २ किमी अंतरावर नागदेव पहाडीच्या कपार्टमेंट नंबर ९६ जवळ रात्री दुसऱ्या वाघाशी झुंज केली. ज्या वाघाने ठार केले ४ ते ५ वर्षाचा असावा. नेहमीप्रमाणे गस्त घालण्यासाठी वनकर्मचारी त्या भागात गेले असतांना ९ ते १० वर्षाचा वाघ गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळला.

गस्त करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांनी याची माहिती वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. घटनेची माहिती मिळताच उपवनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक जयरामे गौडाआर, नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र उपसंचालक राहुल गवई, नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, सहाय्यक वनसंरक्षक एम.एस.चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. एम. भोसले हे घटनास्थळी दाखल झाले. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या प्रमाणभुत कार्यपध्दतीनुसार गठीत समितीद्वारे घटनास्थळ परिसराची व मृत वाघाची पाहणी करण्यात आली. सदर समितीमध्ये मानद वन्यजीव रक्षक सावन बहेकार, एनटीसीए रुपेश निंबार्ते, छत्रपाल चौधरी, पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. शितल वानखेडे, डॉ. सौरभ कवठे, डॉ. समिर शेंद्रे, डॉ. उज्वल बावनथडे यांचा समावेश होता.

Gondia district wikipedia
Gondia news today
Gondia district information
Gondia map
Gondia tourist places
Gondia famous for
Gondia distance
Gondia in which state