

आमगाव (Amgaon) ता. २२ :- पाडळदौना बोरकन्हार सीमेलगत कालीबाडी समोरील पांधण रस्त्यावर शनिवारी जवळपास पोलिसांनी गोपनीय माहितीवरून मोठी कारवाई केली. यामध्ये कततखान्यात नेण्यासाठी बांधून ठेवलेल्या शेकडो जनावरांची सुटका करण्यात आली.
एका खासगी गेवर तीन मोठे शेड तयार करून त्यात जनावरांन अत्यंत वाईट परिस्थितीत डांबून ठेवले होते. या ठिकाणी विविध प्रकारच्या गायी व बैल या जनावरांची मोठ्या प्रमाणावर कत्तल करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळवली पोलिसांनी तत्काळ पथक तयार करून घटनास्थली छापा टाकून सर्व जनावरांची सुटका केली. या कारवाईतपास शंभराहून अधिक जनावरांना मुक्त केले
पोलिसांच्या वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे जरावरांचे जीव वाचले आहे . जनावरांच्या सुटकेनंतर त्यांची तात्पुरती व्यवस्था सध्या गोशाळेत करण्यात आली. या प्रकरणात प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तरास उपविभागीय पोलिस अधिकारी मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक तिस्पती राणे यांच्या नेतृत्वाल तपास सुरु आहे. पोलिसांनी जनावरांची तस्करी आणि कत्तल करणाऱ्या टोळीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.