Gondia News : तिरोडा तालुक्यातील ९१ कृषी केंद्राचे परवाने केले कायमस्वरुर्पी रद्द

0
Gondia News : तिरोडा तालुक्यातील ९१ कृषी केंद्राचे परवाने केले कायमस्वरुर्पी रद्द
gondia-news-licenses-of-91-agricultural-centers-in-tiroda-taluka-have-been-canceled-permanently

गोंदिया (Gondia) :- जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोगस बी- बियाणे, खते व कीटकनाशकाच्या विक्रीस आळा घालण्यासाठी कृषी विभागाने ९ भरारी पथक स्थापन केली आहेत. तसेच २६ गुणनियंत्रण निरीक्षकांचा समावेश असून, गुणनियंत्रण निरीक्षकामार्फत कृषी केंद्राची अचानक तपासणी केली असता त्यात अनियमितता आढळल्याने ९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरुपी रद्द, तर आठ केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले.

कृषी केंद्राच्या तपासणीवेळी विक्री परवान्यामध्ये उगम प्रमाणपत्राचा समावेश नसणे, नोंदणी प्रमाणपत्र विहित मुदतीत नूतनीकरण न करणे, शिल्लक साठा व दरपत्रक दर्शनी भागात न लावणे, साठा व विक्री रजिस्टर न ठेवणे, रजिस्टरवरील साठा व प्रत्यक्ष साठा न जुळणे, विक्री करीत असलेल्या कृषी निविष्ठांचे खरेदी बिल न ठेवणे, ग्राहकास देण्यात येणाऱ्या खरेदी पावतीवर ग्राहकाची सही न घेणे, आदी कारणामुळे ८ कृषी केंद्रांचे (Agriculture Centre) परवाने दोन महिन्यांसाठी निलंबित केले. शेतकऱ्यांना त्यांच्यात गावात कृषी निविष्ठा उपलब्ध व्हावे म्हणून शैक्षणिक पात्रता असलेल्या अर्जदारांना परवाना देण्यात आले होते. परंतु, कृषी केंद्र संचालक यांनी परवान्यामध्ये नमूद घर क्रमांकावर कृषी केंद्र उघडलेले नव्हते.

एस.आर. कृषी केंद्र दांडेगाव, ता. गोंदिया बियाणे, खते व कीटक- नाशके परवाना दोन महिन्यांकरिता, शेतकन्या महिला शेतकरी उत्पादक कंपनी, दांडेगाव, ता. गोंदिया बियाणे, खते व कीटकनाशके परवाना २ महिन्यांकरिता, मो. गायत्री कृषी केंद्र मेंढा, ता. तिरोडा बियाणे, खते व कीटकनाशके परवाना २ महिन्यां- करिता, असे एकूण आठ परवाने निलंबित करण्यात आले आहे.

Gondia district wikipedia
Gondia to Nagpur distance
Gondia distance
Gondia map
Gondia famous for
Gondia tourist places
Gondia district information
Gondia in which state