राशीधाम मध्ये सुवर्ण संधी …

0

नागपूर (Nagpur) : शंखनाद न्यूज चॅनलच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या भव्य पाककला स्पर्धेत आपण उत्स्फूर्त सहभाग दर्शविला. त्यामुळेच ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडू शकली. स्पर्धेच्या निमित्ताने झालेली भरघोस बक्षीसांची लयलूट देखील आपण सर्वांनीच अनुभवली.

आता आपल्यासाठी आणखी एक सप्रेम भेट आम्ही घेऊन येत आहोत. नागपूर शहरातील सुप्रसिद्ध राशिधाम या संस्थेच्या वतीने आपल्यासाठी सेवार्थ कुपन्स उपलब्ध करून देत आहोत. राशिधाम तर्फे खास शंखनादच्या या स्पर्धकांसाठी हे कुपन्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आपल्या स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांच्या किंवा मित्र परिवारातील कुणाच्याही संदर्भात भेडसावणाऱ्या कुठल्याही समस्यांचे समाधान व उपाय कुंडली, हस्तरेषा, अंकशास्त्र यांच्या माध्यमातून राशीधाम तर्फे सुचविण्यात येतील. आपली ही भेट म्हणजे विनाशर्त विनम्र सेवा आहे. त्यामुळे या एक तासाच्या भेटीत आपण आपले प्रश्न, समस्या या संदर्भात राशिधाम मधील तज्ज्ञ व्यक्तींशी चर्चा करू शकता.

चला तर मग, वाट कसली बघताय? आपल्याला प्राप्त झालेल्या या कुपनचा लाभ घ्या आणि राशीधामला भेट देऊन आपल्या समस्यांचे उत्तर जाणून घ्या….येताय् ना मग?