

महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचा पुढाकार
नागपूर (Nagpur), 22 फेब्रुवारी
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून पर्यटकांना सीताबर्डी किल्ल्याची सहल घडविण्यात येणार आहे. शुक्रवार, 28 फेब्रुवारी रोजी सीताबर्डी किल्ल्ला येथून ही सहल आयोजित करण्यात आली आहे.
महामंडळाची ही पहिली सहल शुक्रवारी सकाळी 8 वाजता सीताबर्डी किल्ला येथून सुरू होईल. याकरिता प्रतिव्यक्ती 100 रु. प्रवेश शुल्क आकारण्यात येईल. यामध्ये स्नॅक्स, चहा व पाणी बॉटल देण्यात येणार आहे. तसेच पर्यटकांना किल्ल्याची माहिती देण्याकरिता सोबत महामंडळातर्फे प्रशिक्षित गाईड, तसेच लष्करी अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. हा किल्ला सुरक्षा व इतर कारणास्तव पर्यटकांना बघता येत नव्हता. परंतु आता मर्यादित संख्येने हा किल्ला पर्यटनासाठी खुला करण्यात आला आहे.
1817 मध्ये नागपूरचे आप्पासाहेब भोसले व ब्रिटिश यांच्यामध्ये सीताबर्डीची लढाई झाली. ब्रिटीश राजवटीत या किल्ल्याला सीताबर्डी हे नाव देण्यात आले.
या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याकरिता समन्वय अधिकारी सुनील येताळकर व हेमंत करपते यांच्याशी 9021515519, 8422822000 या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.