Gold Rate Today :काय सांगता ! तब्बल 7 हजारांनी सोनं स्वस्त

0

काही दिवसांपूर्वी भारतात सोन्याचा भाव एक लाखाच्या पुढे गेला होता. आता मात्र सोन्याचा भाव सातत्याने घसरताना दिसतोय. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होताना दिसतेय. आजदेखील सोन्याचा भाव घसरला आहे.

Gold Rate Today : काही दिवसांपूर्वी भारतात सोन्याचा भाव एक लाखाच्या पुढे गेला होता. आता मात्र सोन्याचा भाव सातत्याने घसरताना दिसतोय. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होताना दिसतेय. आजदेखील सोन्याचा भाव घसरला आहे.

मुंबईत सोन्याचा भाव किती?

मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 87,550 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 95,510 रुपये प्रति दहा ग्रॅम रुपये आहे. तुलनाच करायची झाल्यास शुक्रवारी 22 कॅरेट सोन्याचा भाव 87,740 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 95,720 प्रति 10 ग्रॅम रुपये होता. म्हणजेच शुक्रवारच्या तुलनेत आज (4 मे) सोन्याचा भाव घसरला आहे.

देशाच्या अन्य शहरांत सोन्याचा दर किती आहे?

दिल्ली आणि जयपूर शहरात 22 कॅरेट सोन्याचा भाव 87,700 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 95,660 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. अहमदाबाद आणि पटणा या शहरांत 22 कॅरेट सोन्याचा भाव 87,600 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 95,560 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. मुंबई, चेन्नई, हैदरबाद, बंगळुरू, कोलकाता या शहरांत 22 कॅरेट सोन्याचा भाव 87,550 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 95,510 रुपये प्रति 10 ग्रॅम वर आहे. आज मुंबईत चांदीचा भावही 98,000 प्रतिकिलो रुपयांवर गेला आहे.

सोन्याच्या भावात घसरण का होतेय?

गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भावात सातत्याने घसरण होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजार, आयात शुल्क, डॉलर्सच्या तुलनेत रुपयाची किंमत आदी स्थितीवर सोन्याचा भाव अवलंबून आहे. भारतातील सोन्याची मागणी यावरूनही सोन्याचा दर ठरतो.

दरम्यान, सध्याची बाजाराची स्थिती लक्षात घेऊनच गुंतवणूकदारांनी सोन्यात गुंतवणूक केली पाहिजे, असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. सध्या सोनं आपल्या सर्वोच्च दरावरू 7000 रुपयांनी घसरला आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्याची हीच योग्य संधी असल्याचे म्हटले जात आहे. पण सोन्यात गुंतवणूक करताना योग्य तो अभ्यास करूनच गुंतवणूक करावी.