

मुंबई: दिवाळीपूर्वी सोन्याने नुस्ता हाहाकर माजवला आहे. सणासुदीत सोन्याच्या दागिन्यांना भरघोस मागणी असणार म्हणून सोन्याचे दर काहीचा काही वाढलेले पाहायला मिळाले. दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्याचे दागिने खरेदी करणे शुभ मानले जात असल्याने लोकांनी आर्वजून सोन्याचे दागिने बनवतं असल्याने सोन्याचे भाव गगनाला भिडलेले पाहायला मिळाले. सोन्याचा भाव आज ४०० रुपयांनी वाढला असून ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
सराफा बाजारात सोन्याची किंमत
दिवाळीपूर्वी दागिने खरेही करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला झळ बसणार. दिवाळीच्या शुभ दिवसावर आवर्जून लोक दागिने खरेदी करतात त्यामुळे सोन्याचे भाव वाढलेले पाहायला मिळाले. आता दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना सोन्याच्या दरात काहीच घसरण पाहायला मिळत नाही. सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ८०,०७० इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव ७३,४०० रुपये आहे. १ किलो चांदीची किंमत ही आज १,०४,००० रुपये इतकी आहे.
वायदे बाजारात सोन्याची किंमत
सोन्याच्या फ्युचर्सच्या किंमतीही वाढलेल्या पाहायला मिळाल्या पण ही वाढ किंचीतशीच दिसली. आता दिवाळीपर्यंत सोन्याचे दर वाढलेले पाहायला मिळतील असे एकंदरीतच चित्र दिसतंय. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा बेंचमार्क डिसेंबर करार आज ८२ रुपयांच्या वाढीसह ७८,४७७ रुपयांवर उघडला. मागील बंद हा ७८, ६५६ रुपयांवर झाला. आज सोन्याच्या फ्युचर्सच्या किंमत मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर डिसेंबर कराराची किंमत ही ७९,७४५ रुपये आहे.