‘ग्लोबल इंडियन स्टार्स’ संगीत प्रज्ञाशोध स्‍पर्धा

0

– जीआयआयएस नागपूर व संगीतकार शेखर रावजियानी यांचा नि:शुल्‍क उपक्रम
– नागपुरातील उदयोन्‍मुख संगीत प्रतिभांसाठी अनोखी संधी

नागपूर, (Nagpur)
शहरातील उदयोन्‍मुख संगीत प्रतिभांचा शोध घेऊन त्‍यांना गायन व वाद्याचे ज्ञान देण्‍याच्‍या व कौशल्‍य विकसीत करण्‍याच्‍या उद्देशाने प्रसिद्ध संगीतकार व गायक शेखर रावज‍ियानी व नागपूरची ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल (जीआयआयएस) लावा कॅम्पस तर्फे ‘ग्लोबल इंडियन स्टार्स’ ही संगीत प्रज्ञाशोध स्‍पर्धा आयोजित करण्‍यात आली आहे.
कनिष्ठ वयोगट 7 – 10 वर्षे व वरिष्‍ठ वयोगट 11 – 16 वर्षे (31 ऑक्टोबर 2024 तारखेला) अशा दोन गटात तसेच, गायन व वादन अशा दोन श्रेणीत ही स्‍पर्धा होणार आहे. प्रवेश नि:शुल्‍क असून स्‍पर्धकांना दोन मिनिटांचा गायन किंवा वादनाचा व्हिडिओ आयोजकांकडे पाठवायचा आहे. प्राप्‍त झालेल्‍या व्‍ह‍िडिओ सादरीकरणांमधून उत्‍कृष्‍ट 100 स्‍पर्धकांची निवड करून त्‍यांचे व्हिडीओ प्रतिष्‍ठीत ज्‍युरींना पाठवल्‍या जातील. त्‍यातील उत्‍कृष्‍ट 20 स्‍पर्धकांना अंतिम फेरीमध्‍ये प्रवेश दिला जाणार आहे.

येत्‍या 30 नोव्हेंबर 2024 रोजी जीआयआयएस लावा कॅम्पस, नागपूर येथे अंतिम फरी होणार असून शेखर रावजियानी यांची यावेळी विशेष उपस्थिती राहणार आहे. या स्‍पर्धेतील विजेत्‍यांना एकूण 4 लाख रुपयांपर्यंतची पारितोषिके, जीआयआयएस नागपूर येथे शिष्यवृत्ती तसेच, शेखर रावजियानी यांच्या मार्गदर्शनात संगीत शिकवण्‍याची संधी मिळणार आहे. इच्‍छूक विद्यार्थ्‍यांनी 16 नोव्हेंबर 2024 पूर्वी नावे नोंदवावी व त्‍यासाठी अभिषेक हरी – 8439841724 व तनुज – 9930279350 यांच्‍याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.