

नागपूर (Nagpur) १९ सप्टेंबर :- श्रीमती कमलाबाई देशपांडे मेमोरियल ट्रस्ट नागपूर यांच्या सौजन्याने आणि ऋतुराज नागपूर प्रस्तुत ‘अनुवंशिकता… आणि मी’ हा कार्यक्रम गुरूवार, १९ सप्टेंबर 2024 रोजी सायंटिफिक सभागृह, आठरस्ता चौक लक्ष्मीनगर येथे संध्याकाळी ६.३० वाजता होणार आहे.
या कार्यक्रमात हृदयविकार, मधुमेह, कोलेस्टेरॉल, आणि उच्च रक्तदाब अशा आई-वडिलांकडून मिळणा-या अनुवांशिक आजारांपासून मुलांचे संरक्षण कसे करावे, याबद्दल एक संगीतमय चर्चा होणार आहे. कार्यक्रमाची संकल्पना ऋतुराजच्या संचालिका मुग्धा तापस यांची आहे.
डॉ. प्रभाकर के. देशपांडे हे अनुवंशिक आजारांसंदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन करतील तर प्रसिद्ध गायक गुणवंत घटवाई, डॉ. मंजिरी वैद्य-अय्यर, मुकुल पांडे विविा गाणी सादर करणार आहेत. त्यांना गोविंद गडीकर, परिमल जोशी, मोरेश्वर दहासहस्त्र, विशाल दहासहस्त्र हे वाद्यसंगत करतील. कार्यक्रमाचे निवेदन आसावरी गलांडे- देशपांडे करणार आहेत. या नि:शुल्क कार्यक्रमाचा आस्वाद सर्व रसिकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.