

नवी दिल्ली (New Dellhi), ६ जून, : गाझा शहरात इस्राइलचे हल्ले अजूनही सुरूच आहेत. शहरातील शाळेवर झालेल्या हल्ल्यात ३० पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायली लढाऊ विमानाने तीन शाळेच्या वर्गांवर बॉम्बहल्ले केले. त्यात अनेक पॅलेस्टिनींनी आश्रय घेतला होता.गाझा सरकारकडून या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. मात्र अद्याप या घटनेवर इस्रायली बाजूने कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.