चंद्रपुरात रविवारी ‘गर्जा महाराष्ट्र माझा’

0

100 नवोदित कलावंतांचा कलाविष्कार

 

चंद्रपूर , ता. 27 : (CHANDRAPUR)चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे 100 नवोदित कलावंतांचा कलाविष्कार (‘Garja Maharashtra Maja’)‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या कार्यक्रमाचे आयोजन रविवार 30 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता स्थानिक प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात करण्यात आले आहे.स्पार्क जनविकास फाऊंडेशनने या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. (Culture of Maharashtra)महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची जीवनशैली आदींचे दर्शन या कार्यक्रमातून घडणार आहे. सहा महिन्यांच्या बालकापासून 70 वर्षाच्या वृद्ध कलावंतांचाही यात समावेश आहे. संकल्पना आनंद आंबेकर यांची असून दिग्दर्शन प्रज्ञा नागपुरे-जीवनकर यांचे आहे.

नृत्य दिग्दर्शन (Mrinalini Khadilkar-Gangshettywar)मृणालिनी खाडीलकर-गंगशेट्टीवार यांचे असून संगीत संयोजन नंदराज जीवनकर यांचे आहे. अविनाश दोखरखंडे हे सहायक दिग्दर्शक आहेत. हरिश इथापे, संजय वैद्य, प्रदीप़ खांडरे, शैलेश दुपारे, सुशील सहारे, गोलू बाराहाते यांचे मार्गदर्शन लाभले आहे. याच वेळी स्पार्क जनविकास फाऊंडेशनचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. सदर कार्यक्रमाला उपस्थित राहून नव कलावंतांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन स्पार्क जनविकास फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

 

पनीर भुर्जी करी आणि आटा व्हेज टिकीया | Paneer Bhurji Curry Recipe |Atta Veg Tikkiya Recipe |Ep- 117