निळू फुलेंची कन्या गार्गी फुले राष्ट्रवादीत

0

पुणे (Pune): ज्येष्ठ अभिनेते स्व. निळू फुले (Nilu Phule)यांच्या कन्या व अभिनेत्री गार्गी फुले (Actress Gargi Phule)यांनी यांनी (NCP) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. मंगळवारी त्यांनी विरोधी पक्ष नेते (Ajit Pawar)अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP state president Jayant Patil)यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आपली राजकीय इनिंग सुरु (Actress Gargi Phule Joins NCP) केली. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Congress president Sharad Pawar)यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

अभिनेत्री गार्गी फुले (Actress Gargi Phule)यांनी सोशल मिडियावर पोस्ट करून आपल्या नव्या प्रवासाची माहिती दिली आहे. यावेळी अभिनेत्री सविता मालपेकर (Actress Savita Malpekar) यांची उपस्थिती होती. गार्गी फुले यांनी पुण्यातील अभिनय विद्यालयातून शिक्षण घेतले आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठातून एमए ची पदवी घेतली आहे. ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार (Mahesh Elkunchwar)यांच्या ‘सोनाटा’ नाटकाच्या माध्यमातून त्यांनी अभिनय व नाट्यक्षेत्रात पदार्पण केले होते. झी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ तसेच ‘कट्टी बट्टी’ या मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केलाय. त्याचप्रमाणे कलर्स मराठी वरील ‘राजा राणीची ग जोडी’ तसेच ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत त्यांनी भूमिका केल्या आहेत.