

विविध कार्यक्रमाचे आयोजन
वर्धा :- सेवाग्राम येथील आई वत्सला स्कूल ऑफ नर्सिंग सेवाग्राम येथे गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. या दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमास संस्थेच्या कार्याध्यक्ष शुभांगी ताई थुटे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या. संस्थेचे अध्यक्ष बाबाराव बारई , नर्सिंग स्कूलचे संचालक दिनेश बारई, सामाजिक कार्यकर्ता नितीन थुटे, एडमिन ऑफिसर पारस बेलखोडे तसेच योगिता मॅडम ,आचल मॅडम, सोनाली मॅडम,
अनिकेत सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीला सेवाग्राम मेडिकल चौकातून भव्य मिरवणूक काढून ढोल ताशाच्या गजरात कॉलेज मध्ये गणेशजी ची स्थापना करण्यात आली. विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
गणेशोत्सव दरम्यान आई वत्सला नर्सिंग कॉलेज मध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.