गज्जू यादव चा काँग्रेसला राम राम

0

रामटेक(Ramtek): रामटेक विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते उदयसिंग उर्फ गजू यादव यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला असून, लोकसभेच्या निवडणुकीत दरम्यान राजीनामा दिल्याने, काँग्रेसला मोठा धक्का दिलेला आहे.
दिव्य वतन चे आमचे रामटेक प्रतिनिधी येन.आर.रामेलवार यांना दिलेल्या मुलाखतीनुसार एक-दोन दिवसात प्रचार सभेत त्यांच्या प्रचार सभेत त्यांच्या भाजपात प्रवेश होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांनी यापूर्वी रामटेक विधानसभा क्षेत्राची केंद्रीय माजी मंत्री मुकुल वासले यांनी दिलेल्या काँग्रेस पक्षाच्या तिकिटेवर निवडणूक लढविलेली होती. त्यात त्यांचा पराभव झालेला होता. मागील एक दीड वर्षापासून ते महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संपर्कात होते. बावनकुळे यांनी त्यांच्या निवासस्थाने सुद्धा भेट दिल्यानंतर चर्चेला उत आलेला होता. काँग्रेस पक्षाने यापूर्वी त्यांना पक्षाच्या शिस्तीचे पालन केल्यामुळे त्यांना पक्षातून काढलेले होते. नंतर त्यांचा पुन्हा पक्षात प्रवेश करून घेतलेला होता. मात्र सतत त्यांची उपेक्षा काँग्रेस पक्षाकडून होत राहिल्याने, त्यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकला.
उपसरपंच ते उपसभापती असा त्यांचा प्रवास
ते पूर्वी खैरी बिजेवाडा ग्रामपंचायतचे उपसरपंच तथा रामटेक पंचायत समितीचे उपसभापती राहिलेले आहेत.
मातोश्री काशी देवी शिक्षण संस्थेचे ते सचिव आहेत. त्यांचे धाकटे बंधू रणवीर यादव हे खैरी बिजेवाडा ग्रामपंचायतचे सरपंच असून कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेकचे संचालक आहेत. त्यांचे वडील सोहन लाल यादव तारुण्यापासून ते आज पर्यंत काँग्रेसचे एकनिष्ठ ज्येष्ठ नेते राहिलेले आहेत. पुढे विधानसभेची निवडणूक असून येथील भाजपा शिवसेना शिंदे गट युतीमध्ये * यह नही,वह नही, तिसरा उमदा उमेदवार गजू यादव यांना पाहले जाणार असल्याची चर्चेला बळ आलेले आहे