
-अविनाश कोल्हे यांचा शिक्षकांना सल्ला
-कै. दि. वा. फडणवीस स्मृती व्याख्यानमाला
फोटोओळी – मार्गदर्शन करताना (Avinash Kolhe)अविनाश कोल्हे, व्यासपीठावर (Shripad Joshi)श्रीपाद जोशी, (Ravindra Fadnavis)रवींद्र फडणवीस, (Meera Chafekar)मीरा चाफेकर
(Nagpur)नागपूर, २२ जुलै
दिवसेंदिवस शिक्षकांकडून लोकांच्या अपेक्षा वाढत चालल्या आहेत. विद्यार्थी आणि पालक यांची बदलती मानसिकता लक्षात घेऊन काळाची पावले ओळखत शिक्षकांनी ज्ञानार्जन करावे, असा सल्ला प्रसिद्ध साहित्यिक, लेखक, समीक्षक अविनाश कोल्हे यांनी केले.
स्त्री शिक्षण प्रसारक मंडळातर्फे शनिवारी दुपारी स्थानिक (Dadibai Deshmukh Hindu Girls School)दादीबाई देशमुख हिंदू मुलींच्या शाळेत कै. दि. वा. फडणवीस स्मृती व्याख्यानमालेतील १५ वे पुष्प अविनाश कोल्हे यांनी गुंफले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र फडणवीस, ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद भालचंद्र जोशी, संस्थेच्या सचिव मीरा चाफेकर व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी अविनाश कोल्हे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हा विषय शिक्षकांपुढे उलगडून दाखविला. शिक्षकांशी संवाद साधताना अविनाश कोल्हे यांनी, सध्या इंटरनेट आणि मोबाईल यामुळे शिक्षकांपेक्षा अधिक माहिती विद्यार्थांकडे असते, त्यामुळे माहिती देणे हा विषय गौण ठरत आहे. केवळ माहिती देणे आता पुरेसे नाही, ऑनलाईन शिक्षण देखील अपयशी ठरले आहे, मुलांची मागणी आणि कल कुणीकडे आहे, याचा अंदाज घ्या असा सल्ला त्यांनी दिला. भारतात इंग्रज, यवन आदी राज्यकर्त्यांनी शेकडो वर्षे राज्य केले, पण त्यापूर्वीपासून गुरुकुल देखील होते. तरीही आपले शिक्षण कायम आहेत, भाषा कायम आहेत, केवळ आपले राज्य संपुष्टात आले. शिक्षण व भाषा आजही कायम आहेत, फक्त ज्ञानार्जनाचे माध्यम (टूल) बदलले आहेत, बदलत्या तंत्रज्ञानाचा विचार करुन शिक्षण दिल्यास विद्यार्थी देखील ते आनंदाने ग्रहण करतील असे स्पष्ट करीत इंग्रजांनी मेकॉले शिक्षण पद्धती आणून छात्रतेज नष्ट केले असे स्पष्ट करीत खेळीमेळीच्या वातावरणात विद्याथ्र्यांना शिक्षण देण्याची गरज असल्याचे सांगितले.
स्वागत भाषणातून रवींद्र फडणवीस यांनी, या व्याख्यानमालेले आजवर अनेक विषय काळानुरुप हाताळले आता, काळाची गरज आणि शिक्षण क्षेत्राची स्थिती लक्षात घेता, नव्या शिक्षण प्रणालीचा विषय घेतला असल्याचे सांगितले. चर्चासत्राचे सुरेख संचालन (Shubda Phadnis)शुभदा फडणीस यांनी केले.
दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. त्यानंतर रवींद्र फडणवीस यांच्या हस्ते रोप आणि स्मृतिचिन्ह देऊन अविनाश कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी प्रशांत पाध्ये, मुक्ता फडणवीस-अय्यर, (Seema Fadnavis)सीमा फडणवीस यांच्यासह शाळा, कॉलेजमधील शिक्षक प्राध्यापक उपस्थित होते.