‘विदर्भातील संत’चे गडकरींच्या हस्ते प्रकाशन 1डिसेंबरला

0

(Nagpur)नागपूर – (Vidarbha Sahitya Sangh Vice President Dr. Rajendra Dolke)विदर्भ साहित्य संघाचे उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र डोळके यांच्या ‘विदर्भातील संत’ या ग्रंथाचे प्रकाशन शुक्रवार, 1 डिसेंबर रोजी (Union Minister Nitin Gadkari)केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.

विदर्भ साहित्य संघाच्या चौथ्या माळ्यावरील अमेय दालनात सकाळी 11 वाजता हा प्रकाशन सोहळा आयोजिला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वि.सा. संघाचे अध्यक्ष (c) प्रदीप दाते राहणार आहेत. या ग्रंथावर प्रख्यात संशोधक डॉ. म. रा. जोशी भाष्य करणार आहेत. विदर्भातील संत परंपरेचा व त्यांच्या कार्याचा उल्लेख असलेल्या या ग्रंथाची निर्मिती साहित्य प्रसार केंद्रातर्फे करण्यात आली आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन वि.सा. संघाच्या अध्यक्ष व कार्यकारी मंडळाने केले आहे.