

नागपूर (nagpur ) – नागपूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री न नितीन गडकरी यांच्या प्रचारार्थ रविवारी निघालेल्या लोकसंवाद यात्रेला पश्चिम नागपुरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.जुना दाभा हनुमान मंदिर येथून सकाळी शुभारंभ झाला. दुपारपर्यंत ठिकठिकाणी भर उन्हातही रस्त्याच्या दुतर्फा नागपूरकरांनी गडकरींचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली.
कहो दिलसे नितीनजी फिर से… अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते संजय भेंडे, माजी आमदार सुधाकरराव देशमुख, डॉ आशीष देशमुख, प्रवीण दटके, मायाताई इवनाते,शहराध्यक्ष जितेंद्र (बंटी) कुकडे, माजी महापौर संदीप जोशी, गिरीश देशमुख आदी उपस्थित होते.
गडकरी यांच्या प्रचारासाठी सजविण्यात आलेल्या खास रथावर स्वार झालेले गडकरींनी लोकांचे हात उंचावत अभिवादन केले. कुठे ढोल ताशाच्या गजरात, तर कुठे औक्षवाण करून लोक स्वागत करीत होते. अनेक वस्त्यांमधील ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून आशीर्वाद दिले दाभा, मानकापूर,राजनगर,फ्रेंड्स कॉलनी, कोराडी रोड अशा विविध मार्गाने फिरून या लोकसंवाद यात्रेचा सदर परिसरात समारोप झाला.