

महायुतीचे शक्तिप्रदर्शन
नागपूर (Nagpur)-नागपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार राजू पारवे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना होण्यापूर्वी गडकरी यांचे निवासस्थानी गडकरींनी कुलदेवतेचे आशीर्वाद घेतले मंत्रोच्चारात औक्षण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. प्रफुल्ल पटेल,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यानंतर गडकरी संविधान चौकाकडे रवाना झाले. या ठिकाणी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर, विधानभवनासमोर गोंड राजे बख्त बुलदंशाह यांना अभिवादन केल्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हजारो कार्यकर्त्यांसह मिरवणूकीने रवाना झाले.
मंगळवारी काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे (Congress candidate Vikas Thackeray) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्ताने कधी नव्हे ते काँग्रेस नेत्यांचे एकजुटीचे आणि हजारो कार्यकर्त्यांचे शक्तिप्रदर्शन पहायला मिळाले. रामटेक लोकसभा मतदारसंघातील माजी मंत्री सुनील केदार गटाच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे या देखील आजच नामांकन दाखल करणार असल्याने पुन्हा एकदा माजी मंत्री सुनील केदार यांच्या पुढाकाराने काँग्रेस,मविआ शक्तिप्रदर्शन करणार आहे.